Headlines

टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्न?

[ad_1]

India vs Australia Series: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका (Test Series) रंगतेय. मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये (Nagpur) खेळवला जातोय. पण कसोटी मालिका सुरु असतानाच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतून (border gavaskar trophy 2023) टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाहेर पडलाय. दुखापतीतून बुमराह सावरला असून मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामने बुमराह खेळेल असं बीसीसीआयच्या (BCCI) वतीने सांगण्यात आलं होतं. पण आता मिळालेल्या माहितीनुसार बुमराह पूर्ण मालिकेतूनच बाहेर पडला आहे. कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बुमराह पुनरागमन करेल असं सांगण्यात येतंय.

सरावात केली होती गोलंदाजी
जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे गेले काही महिने विश्रांती घेतली होती. आता तो दुखापतीतून सावरला असला तरी पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) गोलंदाजीचा सराव केला. पण भारतीय व्यवस्थापन सध्या त्याच्याबाबत कोणताही धोका पत्करु इच्छित नाही. त्यामुळेच बुमराहला कसोटी मालिकेत बाहेर ठेवण्यात आलं आहे. 

भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप
एकदिवसीय वर्ल्ड कप 2024 यंदा भारतात खेळवला जाणार आहे. जसप्रीत बुमराह हा भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. वर्ल्ड कपच्या दृष्टीने त्याचं संघात असणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे भारतीय व्यवस्थापन त्याच्याबद्दल सावधगिरीने पावलं टाकत आहे. बुमराहने एनसीएमध्ये गोलंदाजीचा सराव सुरु केला आहे. सध्यातरी त्याल कोणतीही अडचण येत नसल्याचं तिथल्या डॉक्टरांनी सांगतिलं आहे.

बुमराह मोठ्या काळापासून बाहेर
29 वर्षांचा बुमराह पाठिच्या दुखण्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बुमराहची भारतीय संघात निवड करण्यात आली नव्हती. शेवटच्या दोन कसोटी सामन्यात तो खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण ती शक्यताही मावळली आहे. 

रोहित शर्माने दिली होती प्रतिक्रिया
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनेतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जसप्रीत बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात बुमराह खेळेल, पण सध्यातरी आम्ही कोणताही धोका पत्करु शकत नाही, त्याच्या पाठिची दुखापत गंभीर आहे. त्याल दुखापतीतून सावरण्यासाठी पूर्ण वेळ द्यायला हवा असं रोहित शर्माने म्हटलं होतं. 

पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *