Headlines

‘ती नसेल तर…’ आलियाविषयी Ranbir जे बोललाय ते ऐकून डोळ्यात पाणी येतंय

[ad_1]

Ranbir Kapoor : रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (alia bhatt) यांचं लग्न, त्यानंतर आलियाने दिलेली गूड न्यूज आणि मग ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. जवळपास 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर या दोघांनी 14 एप्रिलला लग्न केलं. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीर यांची प्रेमकहाणी (love story) सगळ्यांना पाहिला मिळतं आहे. खऱ्या आयुष्यात या दोघांचं नातं कसं आहे, हे आलिया आणि रणबीर यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. आलिया आणि रणबीरमधील प्रेम हे अनेक वेळा कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

रणबीर आलियाला खूष करण्यासाठी अनेक गोष्टी करत असतो, कधी तिला न सांगता विमानतळावर घ्यायला जातो, तर कधी तिला मुव्ही डेटला घेऊन जातो. चित्रपटामध्ये रणबीर म्हणजे शिव जेवढं आलियावर प्रेम करतो. त्यापेक्षा जास्त तो खऱ्या आयुष्यात प्रेम करतो. आलियाशिवाय रणबीर एक क्षणदेखील राहू शकत नाही. (treading news Ranbir Kapoor cant go to the bathroom without finding alia bhatt nm )

एक पल चैन ना आवे…

हो, हे दस्तुरखुद्द रणबीरने सांगितलं आहे.  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणबीरने आलियावर आपण अवलंबून असल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, “मला खूप अभिमान आहे की मी खूप स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मी वेगळा आहे पण मी आलियावर खूप अवलंबून आहे. मी बाथरूममध्ये जात नाही किंवा जेवत नाही, जोपर्यंत मला माहिती नसतं आलिया कुठे आहे ते…, पुढे तो म्हणाली की, ती माझ्या शेजारी असणे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपण काहीही रोमँटिक किंवा बोललो नाही तरी काही फरक पडत नाही पण तिने फक्त माझ्या शेजारी बसावं.”

तू नाही तर काही नाही…

आलियानेही रणबीरबद्दल काही गुपित उघड केले. ते ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल आणि तुम्ही नक्की म्हणाल की, प्रेम म्हणजे काय असं ते या दोघांकडे पाहून कळतं. आलिया म्हणाली की, ‘रणबीर माझ्याशिवाय काहीही करू शकत नाही हे खरं आहे. मी आजूबाजूला नसलो तर शेवटच्या क्षणी रणबीर सर्व काही सोडून देतो. 

 Ranbir – Alia च्या नात्याची नाजूक बाजू पहिल्यांदाच जगासमोर आली आहे. यांची प्रेमकहाणी ऐकून तुम्हालाही नक्कीच जोडीदार आठवेल…किंवा प्रत्येक तरुणीला वाटतं आपला जोडीदार असावा तर असा…



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *