Headlines

“…तर आम्हाला आवरणं कठीण होईल” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा | Rebel MLA gulabrao patil on aaditya thackeray rno news rmm 97

[ad_1]

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून महाराष्ट्रात ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा चांगलीच गाजत आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. ते बंडखोर आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करत आहेत, तर हे सरकार ‘खोके सरकार’ असल्याची टीकाही त्यांच्याकडून केली जात आहे. आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, “मी काल-परवाच बोललो आहे की, आदित्य ठाकरेंचं वय ३२ वर्षे आहे आणि मी शिवसेनेत ३५ वर्षापासून काम करतोय. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात, पण ते विचारांचे वारसदार नाहीत. आदित्य ठाकरेंवर किती गुन्हे दाखल झाले? हे तुम्ही त्यांना विचारू शकता, ते कोणत्या तुरुंगात गेले हेही विचारा… नाहीतर आम्ही त्यांना सांगतो की १०० वेळा आम्ही काय-काय भोगलं आहे. कलम ३२०, ३०७, १५६ ब, ११० हे काय असतं हे तरी त्यांना माहीत आहेत का?” असा सवालही गुलाबराव पाटलांनी विचारला आहे.

हेही वाचा- बंडखोरी करण्याचा विचार मनात कसा आला? मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

पुढे त्यांनी म्हटलं की, “आदित्य ठाकरेंना आमदार होण्यासाठी आम्हाला दोन एमएलसी कराव्या लागल्या. ते जर वारसदार असतील, तर दोन-दोन एमएलसी देण्याची गरजच काय होती? निवडून येण्यासाठी त्यासाठी तुम्हाला आश्वासनं द्यावी लागली. आम्ही खरे वारसदार आहोत, आम्ही पडल्यावरही उभं राहिलो आणि उभं राहिल्यावरही पडलो. आजपर्यंत एक नेता म्हणून आम्ही त्यांची इज्जत ठेवली आहे. त्यांनी वयाची आणि आमच्या अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नये. नाहीतर आम्ही बोलण्याच इतके कठीण आहोत की त्यांना आवरणं मुश्कील होईल, असा थेट इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे.

हेही वाचा- “सुप्रिया सुळेंचं काम बोलतं” बावनकुळेंच्या विधानावर अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

आज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुलाबराव पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील विविध राजकीय प्रश्नांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं आहे. शिवसेना हा पक्ष नाही, तो एक विचार आहे. तो विचार आम्ही आमच्या डोक्यात ठेवला आहे. त्यामुळे शिवसेना आमचीच आहे, असंही ते यावेळी म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *