Headlines

तैमूरला सांभाळणारी आया पगार म्हणून घेते इतके कोटी? नीतू कपूर यांचा खुलासा

[ad_1]

मुंबई : सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhhla Jaa 10) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. करण जोहर (Karan Johar),  माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) ही या शोचे परिक्षक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये झलकच्या स्टेटवर खूप धमाल झाली, कारण हा एपिसोड ‘कपूर स्पेशल’ होता. 

कपूर स्पेशल एपिसोडमध्ये नीतू कपूर (Neetu Kapoor)  यांनी हजेरी लावली होती. करणचा नीतू आणि तिच्या कुटुंबाशी चांगलं रिलेशन आहे. अशा परिस्थितीत त्यांनी नीतू यांना कपूर कुटुंबाशी संबंधित मजेदार गोष्टीही विचारल्या. करणनं नीतूला विचारले की करीना कपूर (Kareeba Kapoor) तिचा मोठा मुलगा तैमूर अली खानच्या (Taimur Ali Khan) आयाला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे देते का? तसं असेल तर तो तैमूरच्या आयाचं काम करायलाही तयार आहे. (Taimur Ali Khan Nanny Salary) यावर उत्तर देताना नीतू म्हणाल्या, तुला काय करायचं आहे. ती दोन कोटी देत असेल की पाच कोटी. मला कसं कळेल. यानंतर करण नीतूला पुढचा प्रश्न विचारतो, ‘तू भाजी विक्रेत्याशी भांडण करतेस का?’ याच उत्तर देत नीतू होकार देत म्हणतात की मला खूप मजा येते. करणनं हाच प्रश्न पुढे माधुरीला विचारला आणि ती म्हणाली, की ती फुकटात कोथिंबीर पण मागते. (jhalak dikhhla jaa 10 karan johar asked neetu kapoor a question about kareena s son taimur s nanny s salary) 

आणखी वाचा : हिंदी सिनेमांच्या अपयशामुळे ढासळत आहे देशाची अर्थव्यवस्था? रकुल प्रीत सिंगच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ

बातमीची लिंक : स्पर्धकाला एक चूक ठरली महागात, नाही तर जिंकला असता 7.5 कोटी; तुम्ही देऊ शकता या प्रश्नाचं उत्तर?

करणने नोरा फतेहीला विचारलं की तिने कधी भाजी घेतली आहे का, तर नोरा या प्रश्नावर उत्तर देत म्हणाली की तिनं वांगे घेतले आहेत. त्यानंतर करण तिला चिडवतो.  पुढे करण नीतू यांना आणखी एक प्रश्न विचारतो की, ‘कपूर कुटुंबाला एका व्यक्तीकडून गॉसिप मिळते?’ मग नीतू करणचं नाव घेतात. यावर स्पष्टीकरण देत करण म्हणतो की, तो फक्त माहिती देतो, पण रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि करीना कपूर ते पसरवतात.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *