Headlines

T20 World Cup 2022 : ओ पाजी….! क्रिकेटप्रेमींचा उत्साह पाहून अर्शदीपलाही रहावलं नाही, भांगडा करत दाखवलं वेगळं रुप

[ad_1]

T20 World Cup 2022 : एखादा क्रिकेट (Cricket) सामना झाला, की त्यानंतर सामन्याचे विविध पैलू पाहायला मिळतात. मग यामध्ये अगदी सामन्यातील धावांची, षटकांची आकडेवारी असो किंवा मग खेळाडूंचा खेळण्याचा अंदाज. भारत विरुद्ध बांगलादेश (Ind vs ban) या टी20 वर्ल्ड कप  (T20 World Cup) स्पर्धेतील सुपर 12 गटातील सामन्यानंतरही हेच चित्र पाहायला मिळालं. सामना भारतीय संघानं खिशात टाकला. एका क्षणाला तर बांगलादेश भारताचा विजय हिसकावून नेतो की काय अशीच परिस्थिती क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. पण, शेवटी जीव भांड्यात पडला आणि Team India चा उपांत्य फेरीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला. (T20 World Cup 2022 India vs bangladesh highlights arshdeep Singhs dance video viral )

तिथे संघानं सामना जिंकला असतानाच इथे आता विविध गोष्टी समोर येत होत्या. चांगल्या खेळापासून वाईट खेळापर्यंत आणि चांगल्या खेळाडूपासून वाईट खेळाडूपर्यंत बरंच काही बोललं गेलं. यामध्ये अनेकांनी तरबेज बुद्धी लावत विश्लेषणही केलं. पण, एक खेळाडू मात्र या साऱ्यापलीकडे असल्याचं पाहायला मिळालं. 

हा खेळाडू म्हणजे अर्शदीप सिंग (Arshdeep Singh). सामन्यामध्ये कर्णधाराने ओव्हरची जबाबदारी दिल्यानंतर या नवख्या खेळाडूनं त्याची जादू दाखवली. विरोधी संघानं त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजीही केली. पण, आत्मविश्वासाच्या बळावर त्यानं संयमी खेळाचं प्रदर्शन केलं. 

असा हा अर्शदीप मैदानातच भांगडा (Arshdeep Sing bhangda dance video) करूनही प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Arshdeep Singh Viral Video) झाला. ज्यामध्ये अर्शदीप समोरून चालत येताना दिसतो. अचानकच तो दोन्ही हात ठराविक प्रकारे ठेवतो आणि लगेचच तिथं सुरु असणाऱ्या गाण्यावर ठेका धरतो. 

काही क्षणांसाठी का असेना, पण हा डान्सर अर्शदीप सर्वांनाच वेड लावून गेला. आपल्या या काही मिनिटांच्या परफॉर्मन्सनंतर त्यानं बाऊंड्रीपलीकडे बसलेल्या क्रिकेटप्रेमींची भेट घेतली आणि तिथं त्याच्याच नावाचा कल्ला सर्वांनी केला. कमी वयात क्रिकेट जगतामध्ये इतके मोठे खेळाडू असूनही अर्शदीपनं स्वत:चं स्थान निर्माण केल्याचं पाहून तो कौतुकास पात्र ठरताना दिसतोय. 

https://www.youtube.com/watch?v=M35vuWhhYXc

सामन्याविषयी थोडं…. 

बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) भारतीय संघ मैदानात आला ते क्षण काहीसे खास होते. कारण, हा एक विजय भारतीय संघाची उपांत्य फेरी (Semi Finals) ची वाट मोकळी करुन देणार होता. सामन्याची सुरुवात झाली. पहिल्या फळीत आलेल्या फलंदाजांनी निराशा केली. पण, विराट कोहलीनं (Virat Kohli) पुन्हा एकदा संयमी खेळी करत संघाला अपेक्षित धावसंख्या गाठण्यात मदत केली. यावेळी त्याला K.L Rahul चीसुद्धा साथ मिळाली. सामन्यामध्ये अखेरची ओव्हर रोहित शर्मानं (Rohit Sharma) अर्शदीप सिंग (Arshdeep Singh Bowling) ला दिली आणि त्यानं इथे मिळालेल्या संधीचं सोनं केलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *