Headlines

T20 World Cup 2022: कसं ठरवलं जातं नेट-रनरेट? ग्रुप-1 च्या सर्व टीम्सचं गणित बिघडणार?

[ad_1]

T20 World Cup 2022: T20 वर्ल्डकपमध्ये 2022 मध्ये सुपर 12 फेरी सुरू आहे. यामध्ये सेमीफायनलचं तिकीट कोणत्या टीमला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कालच्या दिवशी वर्ल्डकपमध्ये 2 सामने झाले असून पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 20 रन्सने पराभव केला. इंग्लंडच्या विजयामुळे ग्रुप एमध्ये उपांत्य फेरीचे गणित पुन्हा बिघडलंय. त्यामुळे या ग्रुमधून सेमीफायनलचं गणित नेट-रन रेटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

ग्रुप-1 मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही टीम्सचे 5-5 गुण आहेत. तर 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे आणि न्यूझीलंडचा सामना आयर्लंडशी होणार आहे. इंग्लंडला 5 नोव्हेंबरला शेवटच्या सामन्यात श्रीलंकेशी सामना करायचा आहे. 

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी शेवटचा सामना जिंकला तर तिन्ही टीम्सचे प्रत्येकी पाच मॅचमध्ये 7-7 गुण होणार आहेत. यानुसार टॉप-2 नेट रनरेटद्वारे निश्चित केलं जाईल. मात्र हे नेट रनरेट आहे नेमकं काय? आणि हे नेट रन-रेट कसं काढलं जातं हे पाहूया

कसं काढलं जातं नेट-रनरेट?

नेट-रन रेटची मोजण्यासाठी टीमच्या फलंदाजीच्या रन रेटचा दर टीमच्या गोलंदाजीच्या रन रेटमधून वजा केलं जातं. उदाहरणार्थ श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 200 रन्स केले आणि गोलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये फक्त 140 रन्स केले तर त्याचा रनरेट 3 असेल. टीमने 20 ओव्हरमध्ये 20 रन्स केले असल्याने फलंदाजीचं रनरेट 10 असेल. त्याच वेळी, 140 रन्स खर्च केल्याने, त्यांचं गोलंदाजीचं रनरेट 7 असेल. म्हणजे 10 तू 7 वजा केल्यानंतर नेट रन-रेट काढता येईल.

DLS वेळी नेट-रन रेट कसं मोजलं जातो?

पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामन्यात व्यत्यय आला तर रनरेच धावसंख्येच्या ऐवजी सम स्कोअर म्हणजेच DLS लागू केल्यानंतर निर्धारित केलेल्या स्कोअरच्या आधारे मोजली जाते. ऑस्ट्रेलियन टीमने 20 ओव्हरमध्ये 200 रन्स केले आणि पावसामुळे अफगाणिस्तानचं लक्ष्य 16 ओव्हर्समध्ये 170 रन्सपर्यंत कमी झालं तर 16 ओव्हरमध्ये केलेल्या रन्सच्या आधारे नेट रन-रेट ठरवलं जाईल.

ऑलआउट होण्याऱ्या टीमचं मोठं नुकसान 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमने पूर्ण ओव्हर्स खेळल्या परंतु दुसऱ्यांदा फलंदाजी करणारी टीम कमी रन्सवर सर्वबाद झाली तर त्याला नेट-रन रेटमध्ये पूर्ण ओव्हर खेळण्याचा फायदा मिळू शकतो. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यासह नेट-रनरेट वाढतं आणि कमी होतं. जर एखाद्या टीमने पहिल्या सामन्यात चांगला खेळ केला आणि पुढील सामन्यात खराब खेळ केला, तर स्पर्धेतील त्यांच्या नेट रन-रेटवर मोठा परिणाम होऊ शकतो.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *