Headlines

Surya Shani Yuti 2023 : सूर्य आणि शनिची युती! दोन शक्तिशाली ग्रहांमुळे 3 राशी होणार मालामाल

[ad_1]

Surya Gochar February 2023 :  ज्योतिषशास्त्रामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अचडणी आणि संकटाचं निरासन होतं. शास्त्रात ग्रहाचे होणारे संक्रमण आपल्या आयुष्यात कसे बदल घडून आणतात त्याबद्दल सांगितलं जातं. ग्रहांचा राजा सूर्य देव लवकरच कुंभ राशीत जाणार आहे. समाजात मान सन्मान, आरोग्य आणि आर्थिक लाभ हे सगळे परिणाम सूर्य ग्रहाच्या संक्रमणातून दिसून येणार आहे. 

सूर्याचं कधी होणार संक्रमण? (Surya Gochar Date 2023)

शास्त्रानुसार 13 फेब्रुवारीला (13 February 2023) सकाळी 9.57 वाजता कुंभ राशीत संक्रमण करत आहे. शनिदेव आधीच त्या राशीत विराजमान आहेत. अशा परिस्थितीत सूर्य आणि शनिदेव यांची युती (Surya Shani Yuti 2023) होणार आहे. दोन्ही बलवान ग्रहांच्या या संयोगामुळे 3 राशींचं भाग्य उजळणार आहे. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. (Surya Shani Yuti 2023 shani gochar 2023 date 13 February 2023 effect on your zodiac signs Taurus Virgo Sagittarius money astrology news in marathi)

या राशींना 2023 च्या सूर्य संक्रमणाचे फायदे 

धनु (Sagittarius)

कुंभ राशीत सूर्य देवाच्या संक्रमणामुळे (Surya Gochar 2023) धनु राशीच्या भाग्यात वाढ होणार आहे. त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. वेळ तुमच्या बाजूने चालू आहे. पूर्ण मेहनत घेऊन तयारी करत राहा, तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. या कामात वडिलांची मदत घ्या, तुम्हाला त्याचा फायदा होईल. सूर्याचा प्रभाव वाढवण्यासाठी रोज सूर्यदेवाला जल अर्पण करा. 

कन्या (Virgo)

ग्रहांच्या राजाचे हे संक्रमण (Surya Gochar 2023) समाजात तुमचा सन्मान वाढवेल. तुमच्या संघर्षाचे फळ घेण्याची वेळ आली आहे. विरोधक तुमच्या विरोधात षडयंत्र रचतील पण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि समंजसपणाने त्यावर मात कराल. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या वागणुकीचे आणि कामाचे कौतुक होईल. समाजात तुमची चांगली प्रतिमा निर्माण होईल. 

वृषभ (Taurus)

सूर्य देवाच्या संक्रमणामुळे (Surya Gochar 2023) वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा विजय होणार आहे. या राशीचे लोक जे खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते, त्यांना यासाठी चांगली संधी मिळू शकते. तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीकडून नोकरीचे ऑफर लेटर मिळू शकते. 15 मार्चपर्यंत व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत. तुम्ही भाड्याचं घर सोडून तुमच्या स्वप्नातल्या घरात शिफ्ट होऊ शकता. समाजात तुमची कीर्ती वाढू शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *