Headlines

सुकेश चंद्रशेखरप्रकरणात नवा खुलासा; भेट घेण्यासाठी तिहार जेलमध्ये पोहोचल्या दोन अभिनत्री

[ad_1]

Sukesh Chandrasekhar : दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सोमवारी २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात नवे खुलासे केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने (sukesh chandrasekhar) अनेक अभिनेत्रींना आपल्या जाळ्यात अडकवल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू देऊन सुकेश चंद्रशेखरने (sukesh chandrasekhar) त्यांची फसवणूक केली. नवे खुलासे करताना स्पेशल पोलीस आयुक्त रवींद्र यादव यांनी दोन अभिनेत्रींची नावे सांगितली. या प्रकरणात सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (jacqueline fernandez) अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे झाले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या (delhi police) तपासात प्रत्येक वेळी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित नवीन माहिती बाहेर येत आहे. आरोपी सुकेशने निक्की तांबोळी (nikki tamboli) आणि सोफिया सिंग (sophia singh) यांची तुरुंगात दोनदा भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात ही बाब समोर आली आहे. पोलिसांनी या दोन्ही अभिनेत्रींना तिहार जेल (Tihar Jail ) क्रमांक एकमध्ये गेले. तेथे त्यांनी सुकेशला भेट घेतल्याचे सांगितले. (Actress nikki tamboli and sophia singh met Sukesh Chandrashekhar twice in Tihar Jail)

आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तपास पथक दोन्ही अभिनेत्रींसोबत तिहार तुरुंगात गेले होते. निक्की आणि सोफिया दिवसा सुकेशला भेटायला जायच्या. सुकेशच्या प्रभावामुळे त्यांना आत सोडण्यासाठी कोणतीही कागदी प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे त्या कारागृहात (Tihar Jail) आल्याच्या नोंदी सापडलेल्या नाहीत. दोन्ही अभिनेत्रींनी तुरुंगाच्या गेटपासून सुकेशने ऑफिस बनवलेल्या खोलीत नेले. यावेळी संपूर्ण कारवाईची व्हिडिओग्राफीही करण्यात आली. एका दक्षिण भारतीय वाहिनीचा प्रमुख म्हणून सुकेशने त्याला चित्रपटात भूमिका देण्याचे आश्वासन दिले होते. चौकशीत सुकेशने त्यांना तीन लाख रुपयेही दिल्याचे निष्पन्न झाले.

सुकेश तुरुंगातून त्याची टोळी चालवत होता. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग समोर आला आहे. त्यांच्या चौकशीच्या आधारे कारवाई केली जाईल. त्याचबरोबर बॉलिवूडमधील आणखी काही अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत, ज्या सुकेशच्या संपर्कात होत्या, असे पोलीस आयुक्त रवींद्र यादव यांनी सांगितले.

 दरम्यान, गेल्या वर्षी मे-जूनमध्ये पॅरोलदरम्यान सुकेश अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना भेटला होता. आतापर्यंतच्या चौकशीत कोणालाही क्लीन चिट मिळालेली नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *