Headlines

सुहाना खान-खुशी कपूर झाल्या वेटर; स्मितहास्यनं वाढलं साग्रसंगीत जेवण

[ad_1]

Suhana Khan and Khushi Kapoor Waiter Video: सुहाना खान लवकरच आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटातून दिसणार आहेत. The Archies हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटातून सुहाना खान डेब्यू करणार आहे. फक्त सुहाना खानच नाही तर खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदाही यावेळी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे एकाच चित्रपटातून तब्बल तीन बड्या स्टारचे स्टारकीड्स हे डेब्यू करणार आहे. जेव्हा या चित्रपटाची पहिल्यांदा घोषणा झाली होती तेव्हा नेटकऱ्यांनी एकाच वेळी तीन स्टारकीड्सना पाहून नाराजी व्यक्त केली होती. अनेकांनी यावरून टीका दर्शवली होती. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. नेटकऱ्यांनी या चित्रपटाला मल्टिवर्स ऑफ नेपोटिझम म्हटलं होतं. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता या चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

यावेळी तुम्ही समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये पाहु शकता की, The Archies ची संपुर्ण टीम यावेळी येथे आलेली आहे. सर्वाधिक पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत. त्यामुळे सर्वच जण फारच सुंदर दिसत आहेत. यावेळी या सर्वांच्या पात्रांची नावं ही आर्ची, वेरोनिका, बेटी, रेगी, जगहेड, इथेल, डिल्टन अशी आहेत. यावेळी अगस्त्या नंदा, खुशी कपूर, अदिती डॉट, सुहाना खान, मिहीर अहुजा, वंदाग रैना आणि युवराज मेंडा अशी ही तगडी स्टारकास्ट आहे. यावेळी @thebombaycanteen च्या अधिकृत इन्टाग्राम पेजनं यावेळी माहिती दिली आहे. हे सर्वच जण यावेळी बॉम्बे कॅन्टीनमध्ये आले होते. 

हेही वाचा : अक्षय कुमारनं सुनील शेट्टीला केलं ‘वेलकम’!, चाहत्यांसाठी खास सरप्राईज, आनंदानं माराल उड्या

यावेळी ग्राहकांपुढे केळीचे पानं वाढले होते. कोणत त्यांना पुऱ्या, भाजी, मिठाई वाढताना दिसले. यावेळी खुशी कपूर सगळ्यांना ंमिठाई वाटताना दिसली. तर अगस्त्या नंदा पुऱ्या वाटताना दिसला, सोबतच सुहाना खानही चमचमीत पदार्थ वाढताना दिसली होती. सध्या त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 

पाहा व्हिडीओ : 

The Archies हा चित्रपट पाश्चात्त्य शोवरून प्रेरित आहे. झोया अख्तर याचे दिग्दर्शन करते आहे. काही दिवसांपुर्वी या टीमनं ब्राझील येथे झालेल्या नेटफ्लिक्सच्या Tudum 2023 या शोमध्ये हजेरी लावली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *