Headlines

स्टार खेळाडूच्या ‘या’ चुकीमुळे टीम इंडियाने गमावला पहिला टी 20 सामना

[ad_1]

मुंबई : आयपीएलनंतर लगेच टीम इंडियाचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळत आहेत. या मालिकेसाठी सीनियर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची सीरिज खेळवण्यात येत आहे. यामध्ये पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. 

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने 211 धावांचा मोठा स्कोअर उभा केला. मात्र एका खेळाडूच्या चुकीमुळे टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आता या खेळाडूला टीम इंडियातून वगळण्यात येणार का? हे पाहावं लागणार आहे. 

हा खेळाडू टीमसाठी बनला व्हिलन
श्रेयस अय्यरने हातात असलेला सामना घालवला आहे. एका चुकीमुळे टीम इंडियाला मोठं नुकसान सहन करावं लागलं. श्रेयस अय्यरने दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू व्हॅन डर डुसेन याचा कॅच मोक्याच्या क्षणी सोडला. त्यानंतर या फलंदाजाने 75 धावांची खेळी केली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवणं अधिक सोपं झालं. 

श्रेयस अय्यरने हा कॅच सोडला नसता तर टीम इंडियाला विजय मिळू शकला असता. श्रेयस अय्यरने व्हॅन डर डुसेनचा 29 धावांवर कॅच सोडला. त्याने याचा फायदा घेऊन पुढच्या 15 बॉलमध्ये 45 धावांची केली आहे. 

अय्यरने मिड-विकेटवर हा फलंदाजाचा कॅच सोडला नसता तर टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला नसता. अय्यरला यावरून सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. 

डूसनने सर्वाधिक नाबाद 75 धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलरने नॉट आऊट 64 रन्स केल्या. या दोघांव्यतिरिक्त प्रिटोरियसने 29, कॅप्टन  टेम्बा बावुमाने आणि क्विंटन डी कॉकने 22 धावांचं योगदान दिलं.

आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. आफ्रिकेच्या खेळाडूंनी चौफेर फटकेबाजी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडून अक्षर, हर्षल आणि  भुवनेश्वर कुमार या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. 

आता श्रेयस अय्यरला पुढच्या सामन्यात ड्रॉप करणार का? की पुन्हा एकदा आपली चूक सुधारण्याची संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे. टीम इंडियासाठी ही सीरिज टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. 

टीम इंडिया की प्लेइंग इलेव्हन  :

ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर)  ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर,  हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि आवेश खान.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *