Headlines

Sidharth Kiaraच्या लग्नानंतर मीम्सचा पाऊस, कबीर सिंहही अवतरला

[ad_1]

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding:बॉलिवूडचा शेरशाह सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) ​​आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) मंगळवारी 7 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक अभिनेता-अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. या लग्नानंतर सोशल मीडियावर मीम्सची त्सुनामी आली होती. या मीम्समध्य़े कबीर सिंह ( kabir Singh) कॅरेक्टरवरून नेटकऱ्यांनी खुप मजा घेतली. 

कियाराच्या लग्नाच कबीर सिंहची धाव

सिद्धार्थ मल्होत्रा ​​(sidharth malhotra) आणि कियारा अडवाणीचे (Kiara Advani) राजस्थानमध्ये लग्न लागत असतात, सोशल मीडियावर मात्र कबीर सिंहची चर्चा होती. अनेक नेटकरी कबीर सिंहचे ( kabir Singh) फोटो पोस्ट करून तो लग्नात जात असल्याची चर्चा घडवली होती. अनेकांनी कबीर सिंहवर भन्नाट मीम्स बनवून सोशल मीडियावर शेअर केले होते. या मीम्स सोशल मीडियावर एकच  मैफिल उडवून दिली होती.

नेटकरी कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) यांच्या कबीर सिंग या चित्रपटाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून मीम्स शेअर करत होते. एका युझरने ‘कबीर सिंह’ चित्रपटातील शाहिद कपूरचा फोटो पोस्ट केला आहे, ज्याचे कॅप्शन लिहिले आहे, ‘जेव्हा त्याला कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची माहिती मिळते’. फोटोमध्ये कबीर सिंह रागाच्या भरात बुलेट चालवताना दिसत आहे. खंर तर कबीर सिंह चित्रपटातील हा सीन आहे.

आणखीण एका य़ुझरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर रस्त्यावर धावताना दिसत आहे. यासोबतच ‘प्रीती तू कबीर सिंहसोबत हे कसं करू शकतेस’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. असाच व्हिडिओ पोस्ट करत तिसऱ्या युझरने ‘कबीर सिंग सूर्यगढमध्ये प्रितीच्या लग्नात सहभागी होणार आहेत. भाग कबीर भाग’, असे लिहले आहे. अशाप्रकारे नेटकरी मीम्स शेअर करून मजे घेत होते.

दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा ​​(sidharth malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतले आहेत. तसेच कियाराने या लग्नाचे फोटो सोशल मीडीयावर पोस्ट देखील केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनला कियाराने लिहले की, ‘आता आमचे बुकिंग कायम झाले आहे. पुढील वाटचालीसाठी आम्हाला तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत. या फोटोवर आता शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *