Headlines

शुभमंगल सावधान! लवकरच हृतिक रोशन अडकणार लग्नबंधनात?

[ad_1]

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन  (Hrithik Roshan) आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद (Saba Azad) फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. परंतु त्यानंतरही त्या दोघांच्या चर्चांना उधाण आलं होतं.  आता ते दोघं अनेकदा स्पॉट होतात परंतु नेटकरी त्यांना पुन्हा पुन्हा धारेवर धरताना दिसतातच.

 त्या दोघांचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज (Videos) व्हायरल होत असतात. सध्या एका व्हेरिफिकेशन ट्वीटर अकाऊंन्टवरुन एक ट्वीट व्हायरल होत आहे. आता या ट्वीटवरून सबा आणि हृतिक एकमेकांशी लग्न  (Hrithik Roshan and Saba Azad Marriage) करणार का यावर आता त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या हा विषय चर्चाचा ठरतो आहे. 

खरंच लग्नबंधनात अडकणार का?
हृतिक रोशन  (Hrithik Roshan Marriage) आणि सबा आझाद त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहेत. दोघंही अनेकदा फॅमिली फंक्शन आणि अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात, अगदी सबा हृतिकच्या मुलांसोबत वेळ घालवते. पण दोघांनाही त्यांच्या नात्याला आणखी एक पाऊल पुढे टाकायचं आहे म्हणजेच हे कपल लवकरच लग्न करणार आहे,  

हृतिक रोशन आणि सबा (Hrithik and Saba Wedding Date) मुव्ह-इनची माहिती अभिनेत्याच्या एका जवळच्या मित्राने दिली होती, असे सांगण्यात आले की हृतिकने एक घर देखील विकत घेतले आहे जे शाहरुखच्या मन्नत बंगल्याजवळ आहे, जिथे सध्या नूतनीकरण सुरू आहे. काम सुरू आहे. चालू आहे.

 एअरपोर्टवरील हृतिक सबा Hrithik-Sabaचा किसींग व्हिडिओ व्हायरल
नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद (Hrithik Saba Video) एकाच कारमधून मुंबई विमानतळावर आले होते हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. यानंतर हृतिक त्याची लेडी लव्ह सबाला लिप लॉक करताना दिसत आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

दिवाळीपासून ख्रिसमस आणि न्यू ईयर पर्यंत सबा आणि हृतिक अनेकदा स्पॉट झाले आहेत. त्याचबरोबर एक अनेकदा फॅमिली गेट टू गेदरलाही दिसतात. त्याचबरोबर मुंबईतही ते दोघं अनेकदा एकमेकांना डेट करतानाही दिसले आहेत. करन जोहरच्या (Karan Johar Birthday) 50 व्या वाढदिवशी ते दोघं एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर लंडनमध्येही (London) ते दोघं एकत्र दिसले होते. हृतिक रोशन लवकरच त्याच्या आगामी फायटर या चित्रपटातून दिसणार आहे.  

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *