Headlines

“शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार”, संतोष बांगरांचं सूचक विधान | shinde group mla santosh bangar on dasara melava and hingolicha DJ rmm 97

[ad_1]

Dasara Melava 2022 Latest News : आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा असून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे व बीकेसी मैदानातून एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी सूचक विधान केलं आहे. आज मुंबईत दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार, अशा आशयाचं विधान बांगर यांनी केलं आहे. आपण अनेकदा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ‘हिंगोलीचा डीजे’ ऐकला आहे. त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही, असंही बांगर यावेळी म्हणाले. त्यामुळे यंदा संतोष बांगरही दसरा मेळव्यात बोलणार असल्याचे संकेत त्यांनी स्वत:च दिले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “….तर मी दुर्गेचं रुप धारण करेन”, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

यावेळी संतोष बांगर म्हणाले, “मागील बऱ्याच वर्षांपासून माझी इच्छा होती की ‘हिंगोलीचा डीजे’ मुंबईवरती वाजला पाहिजे. आज महाराष्ट्रातील हिंदुत्वाचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्याला सांगणार आहेत. हे विचार ऐकण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक बीकेसी मैदानावर पोहोचले आहेत. बीकेसी मैदानात सध्या डीजेचा टॉप बेस लावण्याचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा होणार आहेत.”

हेही वाचा- Dasara Melava 2022 : “तुमच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याचीही माझी ऐपत नाही”, पंकजा मुंडेंचं विधान

‘हिंगोलीचा डीजे’ नेमका कोणत्या प्रकारचा आहे? असं विचारलं असता बांगर म्हणाले, “हिंगोलीच्या डीजेबाबत तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मला वाटतं, तुम्ही वारंवार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ‘हिंगोलीचा डीजे’ कसा वाजतो, हे ऐकलं असेल. आज त्यापेक्षाही आगळावेगळा हिंदुत्वाचा आवाज, गर्व से कहो हम हिंदू है, अशा पद्धतीने हा डीजे वाजणार आहे. गेल्या अडीच वर्षात हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे, आज तो आवाज खुलणार आहे, असंही बांगर यावेळी म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *