Headlines

Shikhar Dhawan : न्यूझीलंड विरुद्ध मालिका पराभव, ‘गब्बर’ धवनचा मोठा निर्णय

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (NZ vs IND) यांच्यातील तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. या मालिकेत न्यूझीलंड आधीच 1-0 ने आघाडीवर होती. त्यामुळे न्यूझीलंडने ही मालिका जिंकली. अनुभवी खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यात (India Tour Of New Zealand 2022) विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) एकदिवसीय मालिकेचं कर्णधारपद (Captaincy) देण्यात आलं. मात्र धवनला आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं नाही. यानंतर शिखर धवनने मोठी घोषणा केलीय. धवनने तिसऱ्या सामन्यानंतर आगामी वर्ल्ड कपबाबत मोठी घोषणा केली. (ind vs nz 3rd odi team india shikhar dhawan on bangladesh tour upcoming world cup after)

धवन काय बोलला? 

“टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया एकदिवसीय आणि अनुभवी खेळाडूंचं कमबॅक होणार आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा दौरा व्यावहारिक असेल”, असं धवन म्हणाला. टीम इंडिया या दौऱ्यात टीम इंडिया एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. 

बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल. 

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *