Headlines

‘ज्या चित्रपटात शाहरुख खान तो फ्लॉपच’, सलमानच्या चाहत्यांचा Shahrukh ला विरोध

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. दुसऱ्या दिवशीच चित्रपटाचे अनेक स्क्रिन्स रद्द झाल्याचीही माहिती समोर आली होती तर काही ठिकाणी शोला प्रेक्षकांची गर्दी नसल्याचे दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांनी त्याचा आगामी चित्रपट ‘टाइगर 3’ (Tiger 3)मधून किंग खान म्हणजेच शाहरुख खानला (Shahrukh Khan) बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली आहे. एवढंच काय तर अनेकांनी शाहरुखला पनवती असल्याचे म्हटले आहे. 

YRF स्टुडिओला टॅग करत अनेक चाहत्यांनी सलमानच्या आगामी चित्रपटातील पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेतून शाहरुखला काढून टाकण्याची मागणी केली आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीट करत, ‘@yrf आम्हाला चाहत्यांना एक नम्र विनंती करायची आहे की शाहरुख खानला टायगर 3 मधून काढून टाकावे. या पनवतीमुळे चित्रपट फ्लॉप होणार.’

आणखी वाचा : जेव्हा नागा चैतन्यला गाडीत गर्लफ्रेंडसोबत ‘त्या’ अवस्थेत पोलिसांनी पकडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दुसरा नेटकरी म्हणाला,’अजून चित्रीकरणाला सुरुवात झाली नाही, त्यामुळे ही योग्य वेळ आहे शाहरुखला काढून टाका. तिसरा नेटकरी म्हणाला,’भाईला कोणाचीही गरज नाही, त्याचा चित्रपट ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी तो एकटा पुरेसा आहे. शाहरुखला टायगर 3 मधून बाहेरचा रस्ता दाखवा.’

आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

आणखी वाचा : सुझानला बॉयफ्रेंडसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, ‘याच्यापेक्षा हृतिक लाखपट…
 
काही नेटकऱ्यांनी निर्मात्यांना सल्ला दिला आहे की चित्रपटात कबीरच्या भूमिकेसाठी हृतिक रोशनची निवड करा. एक नेटकरी म्हणाला, आम्हाला टायगर आणि कबीर पाहिजे, कोणी पठाण नाही. मात्र, ट्विटरवर या वादा दरम्यान, ट्रोलर्सनी शाहरुख खानविरोधाक अनेक अपमानास्पद पोस्ट शेअर केल्या आहेत. नेटकऱ्यांनी लगेच अशा चित्रपटांची नावं सांगितली ज्यामध्ये शाहरुख पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत होता आणि ते चित्रपट फ्लॉप ठरले.

आणखी वाचा : ‘या’ ठिकाणी पुरुषांना करावी लागतात दोन लग्न, नकार दिल्यास होते जन्मठेपेची शिक्षा

सलमान खानचा ‘टाइगर 3’ हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)  मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *