Headlines

Oppenheimer च्या इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीतेचा संदर्भ पाहून मोदींच्या मंत्र्याने सेन्सॉरला झापलं; लवकरच कात्री?

[ad_1]

Oppenheimer Box Office Collection : किलियन मर्फी आणि सहकलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘ओपेनहायमर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. (christopher nolan) ख्रिस्तोफर नोलानच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं. प्रदर्शनानंतरच्या पहिल्याच आठवड्यात या चित्रपटानं अक्षरश: अनेकांनाचा भारावून सोडलं. असा हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित असून, अणुबॉम्बचे जनक म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या Oppenheimer या व्यक्तीच्या आयुष्यातील आव्हानात्मक काळ या चित्रपटातून प्रभावीरित्या दाखवण्यात आला आहे. 

एकिकडे चित्रपटाला अमर्याद लोकप्रियता मिळालेली असतानाच दुसरीकडे मात्र त्यामाध्यमातू हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे गंभीर आरोप अनेकांनील केले आहेत. चित्रपटातील एका दृश्याचा संदर्भ देत अनेकांनीच आता भारतात चित्रपटाला प्रमाणित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डालाही धारेवर धरलं आहे. मुळात थेट केंद्रापर्यंतच हे प्रकरण पोहोचल्यामुळं आता त्यावर नेमकी काय कारवाई होणार, याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे. 

मोदींच्या मंत्र्यानं झापलं… 

केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणात लक्ष घालत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Save Culture Save India चे संस्थापक उदय माहुरकर यांनी ट्विट करत एका खुल्या पत्राच्या माध्यमातून केंद्रीय यंत्रणांना साद घालत चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्याविरोधात सूर आळवला. एका प्रणयदृश्यामध्ये भगवद् गीतेचा संदर्भ पाहता ते दृश्य तातडीनं काढण्याची मागणीही त्यांनी केली. ज्यानंतर आता ठाकूर यांनी थेट चित्रपटाच्या निर्माते, दिग्दर्शकांनाच ते दृश्य वगळण्याची सूचना केली आहे. 

Oppenheimer च्या इंटिमेट सीनवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत त्यांनी CBFC अर्थात सेन्सॉर बोर्डालाही खडे बोल सुनावले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी ही दृश्य चित्रपटातून तातडीनं हटवसली जावीत असा आदेशवजा सूर आळवत अशा दृश्यांना सेन्सॉरनंच मान्यता कळी दिली असा सवालही केला. ठाकूर यांची ही भूमिका आणि चित्रपटातील दृश्याला होणारा विरोध पाहता, येत्या काळात सेन्सॉरच्या बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो असंही म्हटलं जात आहे. 

 

सध्याच्या घडीला नोलानच्या या चित्रपटानं जागतिक स्तरावर 165.9 मिलियन डॉलर इतकी तगडी कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ओपेनहायमर यांचं गीतेशी असणारं नातं, त्यांच्या जुन्या मुलाखती प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. पण, कलात्मक स्वातंत्र्य घेत चित्रपटात दाखवण्यात आलेला संदर्भ मात्र वेगळ्याच वादाला तोंड फोडून जाताना दिसत आहे हे नाकारता येणार नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *