Headlines

SAR Value: आरोग्यासाठी किती आणि कसा घातक आहे तुमचा मोबाईल, ‘या’ कोडच्या मदतीने करा माहित, पाहा स्टेप्स

[ad_1]

नवी दिल्ली: SAR Values In Smartphone: स्मार्टफोन खरेदी करताना युजर्स खूप चौकस असतात. फीचर्सपासून ते किमतीपर्यंत सर्व गोष्टी ते आवर्जून तपासतात.फोनमध्ये प्रोसेसर काय आहे, रॅम किती आहे आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन्सकडेही लक्ष देतात. बॅटरीपासून ते डिस्प्लेपर्यंत, ग्राहक सर्वच चेक करतात. परंतु, SAR व्हॅल्यू कडे मात्र त्यांचे लक्ष जात नाही. विशेष म्हणजे, स्मार्टफोन कंपन्याही यावर कमी बोलतात. मोबाईलमुळे किती आणि कोणते नुकसान होऊ शकतात हे अनेकांना माहित असलेच. पण, SAR व्हॅल्यू म्हणजेच फोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. SAR म्हणजेच Specific Absorption Rate हे रेडिओ फ्रिक्वेंसी मोजण्याचे एकक आहे.

वाचा: या देशांमध्येही महाग आहेत आयफोन, भारतापेक्षा खूप जास्त आहे iPhone 14 ची किंमत, पाहा डिटेल्स

सोप्या भाषेत सांगायचे तर, फोन वापरताना आपले शरीर किती रेडिओ फ्रिक्वेन्सी शोषून घेते, हे SAR व्हॅल्यूमध्ये मोजले जाते. म्हणून फोन विकत घेताना स्पेसिफिकेशन्स तपासणे ही चांगली गोष्ट आहे, पण SAR व्हॅल्यूचीही काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.

SAR Value काय आहे?

एखाद्या उपकरणाद्वारे निघणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी, जी आपले शरीर शोषून घेते. ती SAR मध्ये मोजली जाते. म्हणजेच, तुमच्या फोनचे SAR व्हॅल्यू. फोन वापरताना तुमचे शरीर किती रेडिओ फ्रिक्वेन्सी शोषून घेते हे सांगते. मोबाइल फोनसाठी विशिष्ट SAR मूल्य निश्चित करण्यात आहे. भारतात, दूरसंचार विभाग (दूरसंचार विभाग) ने मोबाइल फोनसाठी १.६ W/Kg (१ ग्रॅम टिश्यूवर) मूल्य निश्चित केले आहे.

वाचा: साइड फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme C30s लाँच, फोनमध्ये मजबूत बॅटरी, किंमत खूपच कमी

SAR Value कसे तपासायचे?

फोनचे SAR Value तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रथम, फोनचे युजर मॅन्युअल तपासा. त्याच वेळी, काही कंपन्या फोन वैशिष्ट्यांसह त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर SAR मूल्याचा उल्लेख करतात. ते देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते पाहा.

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या डायर पॅडवर जा. येथे तुम्हाला *#07# टाइप करावे लागेल. हा कोड टाकल्यानंतर, SAR मूल्याचे तपशील तुमच्या स्क्रीनवर दिसून येतील. येथे तुम्हाला दोन प्रकारच्या व्हॅल्यू दिसतील. एक शरीरासाठी आणि दुसरा डोक्यासाठी. तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या डोक्याचे SAR मूल्य जास्त असेल. म्हणूनच तज्ञ फोन संभाषणासाठी इअरफोन वापरण्याचा सल्ला देतात.

वाचा: दिवाळीत नवा स्मार्टफोन खरेदी करायचाय?, या टिप्स फॉलो करा, योग्य स्मार्टफोन आणि पैशाची बचत होईल

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *