Headlines

समांथाचं ग्लॅमर संपलं, तिनं आता…’, अभिनेत्रीच्या करिअरवर निर्मात्याचं मोठं वक्तव्य, तो आहे तरी कोण?

[ad_1]

Chittibabu After Samantha Ruth Prabhu’s Viral Post : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या आजारपणामुळे सतत चर्चेत असते. समांथाचा शाकुंतलम हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी केली नाही. तर दुसरीकडे समांथा सिटाडेल या चित्रपटात दिसणार आहे. या दरम्यान, चित्रपट निर्माता चिट्टी बाबूनं समांथाच्या आजारपणाला पब्लिसिटी स्टंट म्हटलं होतं. समांथानं त्यावर त्यांना नाव नं घेता सडेतोड उत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा चिट्टी बाबू यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

खरंतर, समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली होती. या स्टोरीमध्ये समांथानं गूगल सर्चचा एक स्क्रिनशॉर्ट शेअर केला होता. यात लोकांच्या कानावर कसे केस येतात हे सर्च केल्याचं दिसत होतं. त्याचं उत्तर म्हणून पुरुषांच्या वाढलेल्या टेस्टोस्टेरोन याचं कारण असतं. त्यासोबतच समांथानं #IYKYK असं हॅशटॅग दिले होते. त्याचा अर्थ जर तुम्हाला माहित असे तर… खरंतर समांथाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर चिट्टीबाबू यांनी तिच्यावर कमेंट केली होती. त्यानंतर तिनं ही पोस्ट शेअर केली होती. 

Chittibabu says her days are over After Samantha Ruth Prabhu s Viral Post

समांथाच्या या पोस्टवर आता चिट्टी बाबू यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. चिट्टी बाबू यांनी टीव्ही9 कन्नडा डॉटकॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की माझ्या कानावर असलेल्या आणि माझ्या शरीराच्या इतर भागांवर असलेल्या केसांनी तिचे लक्ष वेधले आहे. तिनं केलेल्या अभ्यासावर आणि रिपोर्टवर माझा कोणताही आक्षेप नाही. 

हेही वाचा : Diljit Dosanjh कडून परदेशात तिरंग्याचा अपमान? पोस्ट शेअर करत थेट नेमकं काय घडलं तेच सांगितलं…

दरम्यान, एका मुलाखतीत चिट्टी बाबू म्हणाले, समांथाचं करिअर संपलं हे वक्तव्य त्यांनी तिच्या आजारपणावर केलं नव्हत तर तिच्या वयानूसार तिनं तरुणमुलीची भूमिका साकारण्यावर होतं. समांथा आता 18 ते 20 वर्षांची नाही. ती आता थोडी मोठी झाली आहे. त्यामुळे शाकुंतलम या भूमिकेसाठी ती योग्य नाही असं मी म्हटलं होतं. तर त्यात चुकीचं काय आहे. तिचे ग्लॅमरस दिवस संपले आहेत आता तिनं सहाय्यक भूमिका साकारायला हव्यात. पुढे ते म्हणाले, समांथा हे स्विकारण्यास तयार नाही. 

शाकुंतलम हा एक तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखक गुणशेखर आहेत. तर त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तर चित्रपटाची कमाई पाहता निर्मात्यांना 20 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *