Headlines

Ruturaj Gaikwad ने रचला इतिहास, Vijay Hazare Trophy त मोठा रेकॉर्ड

[ad_1]

Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy 2022) ऋतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने सौराष्ट्र विरूद्ध शतक ठोकत या स्पर्धेत शतकांची हॅट्ट्रीक ठोकली आहे. या हॅट्ट्रीकसह त्याने अनेक खेळाडूंचे रेकॉर्ड़ ब्रेक करत इतिहास रचला आहे. ऋतुराज विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतक ठोकणारा खेळाडू ठरलाय. त्यामुळे त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.  

सौराष्ट्र विरूद्ध शतक

विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy Final) फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad)  सौराष्ट्र विरूद्ध (Saurashtra Cricket) शतक ठोकले आहे. ऋतुराजने 131 बॉलमध्ये 108 रन्स काढून शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 फोर आणि 4 सिक्स लगावले आहेत. ऋतुराजची ही सलग तिसरी सेंच्यूरी होती. त्यामुळे त्याने शतकांची हॅट्ट्रीक साधली आहे. 

 

 हे ही वाचा : Ruturaj Gaikwad ची शतकांची हॅट्ट्रीक, सौराष्ट्र विरूद्ध खणखणीत शतक

 

आसामविरूद्ध दीड शतक

सौराष्ट्रच्या (Saurashtra Cricket) आधी ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आसामविरुद्धच्या सामन्यात 125 बॉलमध्ये 168 धावा ठोकल्या होत्या. या खेळीत त्याने 18 फोर आणि 6 सिक्स ठोकले होती. ऋतुराजची डबल सेंच्यूरी हुकली असली तरी त्याच्या खेळीने क्रिकेट फॅन्सची मने जिंकली आहेत. 

उत्तर प्रदेशविरूद्ध द्विशतक 

दरम्यान याआधी विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या (Vijay Hazare Trophy 2022) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विरुद्धच्या दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) द्विशतक ठोकले होते.गायकवाडने 159 बॉलमध्ये 220 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 16 सिक्सर मारले होते. तसेच याच सामन्यात त्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले होते. अशी कामगिरी करून त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.

रेकॉर्ड काय?

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सौराष्ट्र विरूद्ध शतक ठोकले आहे. हे ऋतुराजचे स्पर्धेतले 12 वे शतक होते. या शतकासह ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतकांचा विक्रम केला आहे. याआधी रॉबीन उथप्पा आणि अंकित बावणे या खेळाडूंनी 11 शतक ठोकले होते. मात्र ऋतुराजने 12 वे शतक ठोकून या खेळाडूंचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. यासह 12 शतक ठोकत विजय हजारे ट्रॉफीत इतिहास रचला आहे. 

दरम्यान ऋतुराजच्या (Ruturaj Gaikwad) या कामगिरीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.मात्र आता तो महाराष्ट्र संघाला (Maharashtra Cricket) विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद पटकावून देतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *