Headlines

रुबिना दिलीकच्या चेहऱ्याची झाली वाईट अवस्था, बदलेला चेहरा पाहून अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठिण

[ad_1]

Rubina Dilaik Photos : टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक ही एक दमदार पर्सनॅलिटी आहे. तिने टीव्ही इंडस्ट्रीवर आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आपल्या रिअल पर्सनॅलिटीने तिने लोकांना इंप्रेस केलं. तिला बॉस लेडी या नावाने ओळखलं जातं. एवढचं नव्हेतर तिच्या डान्स मुव्हने तिने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. एवढंच नव्हेतर तिने स्टंटमध्येही स्वत:ला सिद्ध केलं.

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीकला छोट्या पडद्यावरची बॉस लेडी म्हटलं जातं. तिचं व्यक्तिमत्व आणि स्थिती तिला टीव्हीची क्वीन बनवते. रुबीना सौंदर्यातही मोठ्या अभिनेत्रींना फाईट देते.  मात्र, यावेळी तिची प्रकृती अत्यंत वाईट आहे. तिच्या सुंदर चेहऱ्याची प्रकृती बिघडली आहे. हे आम्ही म्हणत नसून खुद्द रुबिना दिलीकने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून तिच्या चेहऱ्याची स्थिती दाखवली आहे.

रुबीना दिलैकला झालं इनफेक्शन
खरंतर रुबिना दिलीकची तब्येत अजिबात चांगली नाही. एकीकडे ती आजारी आहे तर दुसरीकडे तिला इनफेक्शनही झालं आहे, त्याचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. रुबिनाने तिचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने फोटोंच्या माध्यमातून तिची अवस्था दाखवली आहे. रुबिनाचा चेहरा, विशेषतः ओठ सुजले आहेत. रुबिनाच्या ओठांना खूप सूज आली आहे. हे फोटो पाहून तुम्ही रुबीनाला ओळखूही शकणार नाही.

रुबिना दिलीकने स्वत:ला बदक म्हटलंय
फोटो शेअर करून अभिनेत्रीने तिचा चेहरा बदकासारखा दिसत असल्याचं सांगितलं आहे. तिचा चेहरा पाहून ती स्वतःही हसत असल्याचं तिने सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, “ताप, घसा खवखवणे, संसर्ग आणि सुजलेले ओठ, मी नक्कीच बदकासारखी दिसते आणि मी निराश आहे आणि स्वतःवर हसते आहे.” रुबिना दिलीकला या अवस्थेत पाहून सेलिब्रिटी आणि चाहते तिच्या खूप काळजीत आहेत.

रुबिना दिलैक शेवटची ‘झलक दिखला जा 10’ मध्ये दिसली होती. ती ‘बिग बॉस 14’ ची विजेतीही आहे. या अभिनेत्रीने ‘खतरों के खिलाडी 12’ मध्येही स्टंट करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. सध्या, चाहते अभिनेत्रीला नवीन प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *