Headlines

Rohit Sharma ला भेटण्यासाठी मैदानात घुसला आणि आता लाखोंचा फटका बसला

[ad_1]

IND vs ZIM T20 WC: रोहित शर्माला भेटण्यासाठी मैदानात येणं एका फॅनला चांगलंच महागात पडलंय. भारत-झिम्बाब्वे (Ind vs Zim) सामन्यादरम्यान एका तरुण चाहता मैदानात घुसला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) पाहून तो रडू लागला. पण असं करणं त्याला चांगलंच महागात पडलंय. कारण त्याने सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने त्याला साडेसहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अनेकदा फॅन्स आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी थेट मैदानात घुसतात. फूटबॉल सामन्या दरम्यान हे अधिक पाहायला मिळतं. पण आता क्रिकेटच्या मैदानात देखील अशा घटना घडत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी फॅन्स सुरक्षा कवच भेदून मैदानात घुसतात. पण अशा फॅन्सला आता दंड ठोठावण्यात येत आहे.

झिम्बाब्वेच्या इनिंग दरम्यान 17 व्या ओव्हरमध्ये एक चाहता अचानक मैदानात घुसला. त्याला रोहित शर्माला भेटण्याची इच्छा होती. रोहित शर्मा त्याला भेटला देखील. पण यामुळे त्याला लाखोंचा फटका बसला आहे. तरुणावर ($11 हजार 95) साडेसहा लाखांचा दंड ठोठावला गेला आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमवत 186 धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) नाबाद 61 आणि केएल राहुलने 50 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ 17.2 षटकांत 115 धावांवर ऑलआऊट झाला. आर अश्विनने टीम इंडियाकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.

भारतीय संघाने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. भारताने त्यांना 186 धावाचं टार्गेट दिलं होतं. पण ते 115 धावाच करु शकले. या विजयामुळे भारतीय संघ आपल्या गटात  पोहोचला आहे. आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *