Headlines

Rohit Sharma कडे डॉक्टरकीची डिग्री? ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचं समोर!

[ad_1]

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गमवावा लागला. इंग्लंडच्या टीमने रोहितच्या टीमचा 100 रन्सने पराभव केला. त्याचवेळी इंग्लंडच्या डावात एक वेळ अशी आली की, टीचा कर्णधार रोहित शर्माला फिजिओची गरज होती, पण रोहितने फिजिओची मदत घेण्याऐवजी स्वतःच्या समस्येवर उपचार केला. रोहितला फिजिओ बनलेलं पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडच्या डावात फिल्डींग करताना रोहित शर्माचा खांदा निखळला. त्यानंतर फिजिओला मैदानावर बोलवण्याऐवजी रोहित शर्माने स्वत: खांदा रिलोकेट केला. रोहित शर्माला हे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटलं आणि यावर त्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या.

यावेळी सोशल मीडियावर एक फोटो असा व्हायरल होतोय, ज्यामध्ये डॉ. रोहित शर्मा असं इंटरनेटवर सर्च केल्यावर दिसून येतंय. एका युजरने म्हटलंय की, “लोकांनी रोहितला पाहून आश्चर्यचकीत होऊ नये, कारण तो स्वतःच ऑर्थोपेडिक आहे.”

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये डॉ. रोहित शर्मा- ऑर्थोपेडिक असं म्हटलंय. या फोटोवर बऱ्याच मजेशीर कमेंट्स येतायत. अनेकांना तर क्रिकेटर रोहित शर्मा डॉक्टर असल्याचा समज झाला.

ज्यावेळी मैदानावर हा प्रसंग घडला तेव्हा भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि विवेक राजदान कॉमेंट्री करत होते. यावेळी दोघंही गमतीने म्हणाले की, रोहित शर्माला पाहून फिजिओ घाबरला असावा. कारण त्यासा आपली नोकरी धोक्यात आली, असं वाटलं असेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *