Headlines

रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या घरी वाजणार सनई-चौघडे; नॅशनल क्रशच्या पोस्टनं एकच चर्चा

[ad_1]

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda’s Engagement : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि रुमर्ड कपल म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. ते दोघं गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. गेल्या महिन्यात रणबीरनं देखील विजय आणि रश्मिकाच्या रिलेशनशिपविषयी हिंट दिली होती. मात्र, आजपर्यंत या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, या सगळ्यात आता त्या दोघांच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. 

रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जातंय की रश्मिक आणि विजय लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यात रश्मिकानं सोशल मीडियावर एका नेटकऱ्याला तिच्या लग्नाविषयी असं काही सांगितलं की तिच्या लग्नाची पुन्हा एकदा सुरु झाली. खरंतर ट्विटरवर एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हणाले, ‘मॅम, तुम्ही आमच्या नॅशनल क्रश आहात. मला आशा आहे की एक दिवस मला तुमच्यासारखी पत्नी मिळेल.’ या ट्वीटवर रश्मिकानं रिअॅक्ट करत लिहिले की ओह… जेव्हा मी लग्न करेन, तेव्हा मला आशा की माझा नवरा देखील मला एक अद्भूत पत्नी समजेल.’

यामुळे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाविषयी चर्चा सुरु झाली आहे. त्या दोघांविषयी बोलायचे झाले तर विजय आणि रश्मिका हे ‘गीता गोविंदम’ च्या शूटिंगच्या दरम्यान, जवळ आले. असं म्हटलं जातं की रश्मिका प्रत्येक सणाच्या दिवशी विजय देवरकोंडाच्या घरी जाते. तर त्यांच्या साखरपुड्याची देखील चर्चा होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडत्यात साखरपुडा होणार आहे. यात आता किती सत्य आहे हे माहित नाही. त्यामुळे जेव्हा हे घडेल तेव्हा सत्य समोर येईल. 

हेही वाचा : ‘ॲनिमल’ च्या टीमनं घेतला जावेद अख्तर यांच्याशी पंगा; चित्रपटाच्या यशाला नावं ठेवणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

रश्मिका मंदाना ही नुकतीच ‘ॲनिमल’ या चित्रपटात दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अजूनही त्याची क्रेझ काही संपलेली नाही असं म्हणण्यात हरकत नाही. लवकरच ‘पुष्पा 2’ मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय तिचा ‘रेम्बो’ हा तेलगू चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. विजय विषयी बोलायचे झाले तर तो समांथा रुथ प्रभूसोबत ‘खुशी’ या चित्रपटात दिसला होता. त्याशिवाय तो ‘फॅमिली स्टार’ या चित्रपटात दिसणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *