Headlines

शारीरिक संबंध पासून ते न्यूड फोटोशूट पर्यंत, या वक्तव्यांमुळे Sherlyn Chopra वादात

[ad_1]

मुंबई : विविध वादांमुळे शर्लिन चोप्रा नेहमीच चर्चेत असते. शर्लिन चोप्रा (sherlyn chopra) विरोधात राखी सावंतने (Rakhi Sawant) मानहानीचा खटला दाखल केला आहे. राखीने शर्लिनवर गंभीर आरोप केले आहेत. ती लोकांना ब्लॅकमेल करते आणि तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ विकते. असा आरोप राखीने केलाय. शर्लिन चोप्रा सध्या साजिद खानबद्दल केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. साजिदवर 10 महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यापैकी एक नाव शर्लिन चोप्राचेही आहे. (controversial statements of sherlyn chopra)

चित्रपट निर्माता साजिद खान (Sajid Khan) शो ‘बिग बॉस 16’ मध्ये आल्यानंतर अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी त्याला शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. या सगळ्या दरम्यान शर्लिन चोप्रानेही साजिद खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पण ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील शर्लिन तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे.

वादग्रस्त वक्तव्य

आर्थिक अडचणीत असताना आपण अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवल्याचं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. नंतर अभिनेत्रीने पुढे असे ही म्हटले की, मला त्या व्यक्ती अजिबात आठवत नाही. शर्लिनने ट्विट केले होते की, ‘यापूर्वी मी पैशासाठी अनेक वेळा सेक्स केले होते.’

न्यूड फोटोशूट

शर्लिन चोप्रा हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जिने प्ले बॉय मासिकाच्या कव्हर पेजवर न्यूड फोटोशूट केले आहे. प्लेबॉय मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमुळेही शर्लिन खूप चर्चेत आली होती. (sherlyn chopra Nude Photoshoot)

भारतरत्न देण्याची मागणी

शर्लिनने स्वत:ला भारतरत्न देण्याची मागणीही केली आहे. अभिनेत्रीचे करिअर फारसे यशस्वी झाले नसले तरी एका मुलाखतीदरम्यान शर्लिन म्हणाली होती की, ती भारताच्या सर्वात मोठ्या सन्मानाची पात्र आहे, त्यामुळे तिला हा पुरस्कार मिळाला पाहिजे.

गँगरेप पीडितेच्या मृत्यूवर वादग्रस्त वक्तव्य

दिल्ली गँगरेप पीडितेच्या मृत्यूनंतरही शर्लिन चोप्राच्या एका ट्विटची खूप चर्चा झाली होती. पीडितेच्या मृत्यूवर अभिनेत्रीने खिल्ली उडवली आणि ट्विट केले की तिच्या बलात्कारानंतर देशातील सर्व मुलींच्या सुरक्षेची हमी असेल तर ती तिच्यावर बलात्कार करण्यास तयार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *