[ad_1]
वाचा: जुना फोन द्या आणि नवीन iPhone घेऊन जा, ‘या’ मॉडेल्सवर मिळत आहे हजारो रुपये डिस्काउंट
ड्युप्लिकेट पॅन कार्ड कधी मागवता येईल?
तुमचे Original Pan Card हरवले, खराब झाले किंवा चोरीला गेले. तर, तुम्ही ड्युप्लिकेटची विनंती करू शकता. पत्ता, स्वाक्षरी आणि इतर तपशिलांमध्ये काही बदल असल्यास देखील तुम्ही त्याची विनंती करू शकता.
ड्युप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
सर्वप्रथम TIN-NSDL च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. (https://www.tin-nsdl.com/) डाव्या कोपर्यात असलेल्या क्विक लिंक्स विभागात जा. नतंर ऑनलाइन पॅन सेवा अंतर्गत, “Apply Pan for Online ” वर जा. Reprint of PAN card वर खाली स्क्रोल करा. पॅन कार्ड Reprint करण्यासाठी तपशील विभागाखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यावर, Request for Reprint of PAN Card ऑनलाइन अर्जाचे पेज तुमच्या समोर उघडेल. येथे सर्व आवश्यक तपशील भरा. तुमचा पॅन क्रमांक, तुमचा आधार क्रमांक , तुमच्या पॅन कार्डशी लिंक केलेला क्रमांक आणि जन्म वर्ष. Information Declaration बॉक्समध्ये खूण करा, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा. सर्व डिटेल्स कन्फर्म करा आणि OTP प्राप्त करण्यासाठी एक मोड निवडा.
वाचा: सोशल मीडियासाठी झक्कास फोटोज काढायचेत ? पाहा हे टॉप ५ Camera Smartphones किंमत २०,००० रुपयांपेक्षा कमी
OTP एंटर करा आणि ते Verify करा. पेमेंट पद्धत निवडा. जर PAN भारतात पाठवायचा असेल तर त्याची किंमत ५० रुपये असेल. जर भारताबाहेर पाठवायचा असेल तर ९५९ रुपये लागेल. तसेच, तुमच्याकडे डुप्लिकेट फिजिकल पॅन कार्डऐवजी ई-पॅन कार्ड ऑर्डर करण्याचा पर्याय आहे. आवश्यक पेमेंट पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रेकॉर्डसाठी Receipt Number दिला जाईल.
वाचा: Portable Fans: विजेशिवाय १५ तासांपर्यंत चालतात ‘हे’ पोर्टेबल फॅन्स, कॅरी करायला सोप्पे, किंमतही खूप कमी, पाहा डिटेल्स
[ad_2]