Headlines

PAN Card चा नंबर विचारून रिकामे होवू शकते बँक अकाउंट, चुकूनही करू नका या चुका

[ad_1]

नवी दिल्लीः पॅन कार्डचा वापर करणाऱ्यांनी आता आणखी अलर्ट राहण्याची गरज आहे. तुमची एक चूक तुम्हाला चांगली महागात पडू शकते. त्यामुळे चुकूनही पॅन कार्ड शेअर केल्यास काही चुका करू नका. कारण, पॅन कार्ड असे एक डॉक्यूमेंट आहे. जे तुमची सर्व खासगी माहिती ठेवते. याला कोणीही एक ओटीपी विचारून मिळवू शकतात. सध्या भारतात अनेक जण फ्रॉडला बळी ठरत आहेत. अनेकांची एक चूक महागात पडत आहे. खात्यातून लाखो रुपये जात आहेत. त्यामुळे डिजिटलच्या जमान्यात अलर्ट राहणे हेच आपल्याला फ्रॉडपासून रोखू शकते.

PAN Card ला Income Tax Department कडून जारी करण्यात येते. खास करून अशा एका यूजर्सला आपल्या पॅन कार्डला विचार करून शेअर करायला हवे. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करीत असाल तर आणखी अलर्ट राहणे गरजेचे आहे. कारण, पॅन कार्डच्या मदतीने सर्व Financial Information मिळवली जावू शकतात. यामुळे कधीही डॉक्यूमेंट्स शेअर करण्याआधी हजारदा विचार करायला हवा.

वाचाः सेलमध्ये मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी केलेला फोन असू शकतो फेक, असं ओळखा, पाहा टिप्स

OTP चुकूनही शेअर करू नका
PAN Card शेयर केल्यानंतर तुमच्या फोनवर जर ओटीपी आला असेल तर लगेच अलर्ट राहा. कारण, असे अनेकदा लोकांसोबत होते. फ्रॉड करणाऱ्यांकडून अनेकदा असा प्रयत्न होत असता. पॅन नंबर घेतल्यानंतर एक ओटीपी पाठवला जातो. या ओटीपीच्या मदतीने सर्व क्रेडिट कार्डची माहिती मिळवली जाते. सोबत किती लोन घेतले याची माहिती सुद्धा माहिती करून घेतली जाते.

वाचाः कमी किंमतीचा 6,000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेराचा सॅमसंगचा नवा फोन लाँच

नियमांप्रमाणे पॅन कार्डला विना क्रेडिट कार्ड जारी केले जात नाही. प्रत्येकाला क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पॅन नंबर शेअर करावे लागते. त्यामुळे पॅन कार्ड शेअर केल्यानंतर चुकूनही कुणासोबतही ओटीटी शेअर करू नका. बँक शिवाय, कोणत्याही व्यक्तीसोबत पॅन कार्ड शेअर करण्याचे टाळायला हवे.

वाचाः आता ट्रेन तिकिट रद्द केल्यावर मिळणार १०० टक्के रिटर्न, पाहा डिटेल्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *