Headlines

PAN-Aadhaar Link : ३१ मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक करा, ‘या’ लोकांना सरकारकडून सूट

[ad_1]

नवी दिल्लीः How to Link PAN With Aadhaar: केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची डेडलाइन ३१ मार्च २०२३ ठेवली आहे. ज्या लोकांनी पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक केले नाही. त्यांना ३१ मार्च २०२३ पर्यंत हे काम करावे लागणार आहे. जर ३१ मार्च पर्यंत हे काम केले नाही तर १ एप्रिल २०२३ पासून पॅन कार्ड कोणत्याही कामाचे राहणार नाही. त्याचा कोणत्याही कामासाठी उपयोग करता येणार नाही.

केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी गाइडलाइन जारी केली होती. तर आयकर विभागाने सुद्धा टॅक्स पेयर कर्त्यांना ही माहिती दिली होती. आयकर अधिनियम १९६१ नुसार, सर्व पॅन कार्ड धारकांसाठी हे बंधनकारक आहे. परंतु, काही लोकांना ३१ मार्च २०२३ च्या आधी पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यापासून सूट देण्यात आली आहे. कोणकोणत्या लोकांना यातून सूट देण्यात आली आहे. सविस्तर जाणून घ्या.

मे २०१७ मध्ये केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचने नुसार, काही कॅटेगरीतील लोकांना पॅन कार्ड व आधार लिंक करण्यात सूट दिली आहे. या लोकांसाठी पॅनला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक नाही.

  • आसाम, मेघालय आणि केंद्र शासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर मधील लोक.
  • आयकर अधिनियम १९६१ अंतर्गत अनिवासी, गेल्यावर्षी ८० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती.
  • जे भारतीय लोक नाहीत.

कोणत्या पद्धतीने पॅनला आधार लिंक करता येते

  • जर तुम्ही पॅला आधार कार्डशी लिंक करू पाहत असाल तर काही पद्धती आहे. ज्याला तुम्ही फॉलो करून हे काम करू शकता.

  • ऑनलाइन प्रक्रिया अंतर्गत आयकरई-फाइलिंग वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर जावून तुम्ही पॅन कार्डला आधारशी लिंक करू शकता.

  • तसेच तुम्ही एसएमएस द्वारे सुद्धा पॅन-आधार लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला SMS द्वारे 567678 किंवा 56161 वर UIDPAN SPACE 12-digit Aadhaar number SPACE 10-digit PAN number मध्ये लिहून पाठवावे लागेल.

  • ऑफलाइ प्रोसेस अंतर्गत तुम्ही पॅनला आधारशी लिंक करू शखता. यासाठी तुम्हाला जवळच्या पॅन सेवा केंद्र किंवा आधार सेवा केंद्रा वर जावे लागेल.

वाचाः Vodafone Idea ने गुपचूप लाँच केला ३० दिवसाचा रिचार्ज प्लान, २५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

वाचाः Holi Phone Safety Tips : पाणी आणि रंगाने खराब होणार नाही स्मार्टफोन, या सोप्या टिप्स पाहा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *