Headlines

पाहा: सचिन तेंडुलकरचा साधेपणा तुम्हालाही भावेल, रस्त्यावर थांबून चहा आणि टोस…

[ad_1]

Sachin Tendulkar Video Viral : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर  (Sachin Tendulkar) सगळ्यांचा लाकडा आहे. सचिने अनेकवेळा प्रवास करताना तुम्ही पाहिले असेल. कधी चंद्रपुरातील ताडोबा असो की कोल्हापूरमधील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (Shree NrusinghwadI) येथे दिलेली श्री दत्त दर्शनासाठीची भेट. मात्र, सचिनच्या प्रवासाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सचिन आपल्या मुलासोबत प्रवास करत आहे. यावेळी त्याने प्रवासात अर्जुनला चहा विचारला. त्यावेळी मुलाची आलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय आहे.

सचिन तेंडुलकर आपल्या कारने लाँगड्राईव्ह होता. प्रवास करताना आपला थकवा घालविण्यासाठी त्याने चहा  घेणे पसंत केले. मात्र, ही चहा एकाद्या चांगल्या हॉटेलमध्ये घेतली नाही तर रस्त्यावरील एका शॉपमध्ये घेतली. याचा व्हिडिओ सचिनने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडिओच्या कॅप्शन आणि हॅशटॅगवरून तो एकतर मुंबईहून गोव्याला जात होता किंवा गोव्याहून मुंबईला येत होता, हे कळतंय. या व्हिडिओ क्लिपला आतापर्यंत 9 लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे.  

महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. याद्वारे तो चाहत्यांसमोर आपली बाजू मांडतो, कधी फोटो तर कधी व्हिडिओ शेअर करतो. (Sachin Tendulkar Video Viral) आता त्याने स्वतःचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो प्रवासाच्या मध्यभागी गाडी थांबवून चहाचा आनंद घेत आहे. मुलगा अर्जुन तेंडुलकरही त्याच्यासोबत आहे. यादरम्यान सचिन अर्जुनला चहा घेणार का, असे विचारतो. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे आणि सचिनचा साधेपणाही.

सचिनने अर्जुनला काय केला सवाल?

व्हिडिओची सुरुवात सचिन एका चहाच्या स्टॉलला भेट देताना दिसतोय. एक कप चहा आणि सोबत टोस घेतला. तो चहाचा आस्वाद घेत आहे. त्याचवेळी मुलाची फिरकीही घेतली. गाडीत बसलेल्या अर्जुनला इशारा करुन विचारतो, चहा घेणार का? अर्जुन एकदम  लाजतो. तो आपला चेहरा गाडीच्या आरशाच्या मागे लपवला. (Sachin Tendulkar road trip with son arjun chai masti)

सचिनला पाहताच चहावाला धक्का…

सचिनने रस्त्यात गाडी थांबवून चहाचा आस्वाद घेतला. क्रिकेटचा देव आपल्या स्टॉलवर आल्याचे पाहताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला. सचिने त्याला हातही मिळवला आणि त्याला आनंद लपवता आला नाही.  या व्हिडिओ क्लिपला आतापर्यंत 9 लाखांहून अधिक यूजर्सनी लाइक केले आहे. याशिवाय 5000 पेक्षा जास्त कमेंट्स करण्यात आल्या आहेत. चायवाला नशीबवान आहे की त्याला ‘देव’ भेटला असे अनेकांनी लिहिले. सचिनला ‘क्रिकेटचा देव’ असेही म्हटले जाते.

शाळेत जाणाऱ्या मुलीची आपुलकीने चौकशी

यादरम्यान सचिनला शाळेत जाणाऱ्या मुलीचीही भेट झाली. यावेळी सचिनने तिची आपुलकीने चौकशी केली. त्याच्या या व्हिडिओमध्ये तो शाळेचा ड्रेस घातलेल्या आणि खांद्यावर बॅग लटकवलेल्या मुलीला भेटताना दिसत आहे. तो तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतो. मुलीसोबत तिचे पालकही दिसत आहेत.  तेही सचिनला पाहून आनंदी झालेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *