Headlines

40 चित्रपटांपैकी 30 फ्लॉप; मॉडेलिंग सोडून अभिनयात आलेल्या ‘या’ मुलाची पैशांअभावी झालेली वणवण

[ad_1]

Arjun Rampal : बॉलिवूडमध्ये आपलं करिअर करण्यासाठी येणारे कलाकार हे खूप स्ट्रगल करताना दिसतात. पण त्यातील सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. काही कलाकारांनी तर आपलं संपूर्ण आयुष्य झोकून देतात, तर काही कलाकार असतात जे शेवटपर्यंत हार मानत नाही आणि ते अखेर सुपरस्टार ठरतात. त्यातही काही कलाकार आहेत जे शेवट पर्यंत मेहनत करतात पण सुपरस्टार ठरले नाही, त्या सगळ्यांचं आज इंडस्ट्रीमध्ये मोठं नावं आहे. ज्या गोष्टीविषयी आपण आज बोलणार आहोत ज्या व्यक्तीनं मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली, त्यानंतर बॉलिवूडमध्ये गेला आणि तिथे गेल्यावर कळलं की कामचं नाही.

कोण आहे हा अभिनेता?

बॉलिवूडमध्ये येण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं तर 51 वर्षांच्या या अभिनेत्यानं बॉलिवूडमध्ये जेव्हा एन्ट्री घेतली त्यानंतर भाडं देण्यापासून जेवण्यापर्यंतच्या त्याच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या. त्यानं एका मुलाखतीत त्याच्या खबाद दिवसांविषयी सांगितलं आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून अर्जुन रामपाल आहे. अर्जुन रामपालनं त्याच्या लूक्सपासून अभिनया पर्यंत सगळ्याच गोष्टीमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. अर्जुननं त्याच्या करिअरमध्ये 40 चित्रपट केले त्यापैकी त्याचे 30 चित्रपट हे फ्लॉप ठरले. 

अर्जुन रामपालनं पॉप डायरीजला नुकतीच मुलाखत दिली होती. यावेळी त्यानं सांगितलं की त्यानं कधी विचारही केला नाही की ज्या पहिल्या चित्रपटासाठी त्यानं मॉडेलिंग बंदी केली, त्याला प्रदर्शित होण्यासाठी सहा वर्ष लागतील. तर त्यावेळी एक-एक रुपयासाठी त्याला स्ट्रगल करावं लागेल याचा विचार देखील त्यानं कधी केला नव्हता. तर मोक्ष या त्याच्या पहिल्या चित्रपटा दरम्यान, त्याला स्वत: चा राग येऊ लागला होता. 

त्याशिवाय त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांविषयी बोलताना तो म्हणाला की “मी एक यशस्वी मॉडेल हतो. अशोक मेहता मोक्ष हा चित्रपट घेऊन माझ्या जवळ आले. तर या चित्रपटात माझ्यासोबत मनीषा कोयराला महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. त्यावेळी ती तिच्या करिअरच्या पीकवर होती. मी चंबलमध्ये तिच्यासोबत एक सीन शूट करत होतो. लोकांची गर्दी आली आणि मी स्वत: ला पाहिलं आणि मला त्यावेळी स्वत: चा राग येऊ लागला होता. मी विचार केला की देवा मी किती वाईट आहे. त्यानंतर मी निर्णय घेतला की मी अजून मॉडेलिंग करणार नाही. पण मला या गोष्टीची कल्पना नव्हती की चित्रपट होण्यासाठी सहा वर्ष लागतील.”

अर्जुननं पुढे सांगितलं की “त्यावेळी माझ्याकडे कोणत्याही प्रकारे पैसे येत नव्हते. मी अंधेरीतील सेव्हन बंगल्यात रहायचो. मी ज्या घरात रहायचो त्याचे मालक खूप चांगले होते. ते प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी माझ्याकडे यायचे. ते माझ्याकडे पाहायचे, मी त्यांच्याकडे पाहायचो. ते म्हणायचे नाही आहेत? आणि मग मी माझी मान हलवायचो. ते म्हणायचे काही नाही तू मला देणार, ते खूप चांगले होते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा लोकांची गरज असते.”

हेही वाचा : ‘तो लुंगी नेसेल आणि मी कांजीवरम साडी’, जान्हवी कपूर ‘या’ मंदिरात करणार लग्न!

अर्जुननं पुढे सांगितलं की “त्यानंतर त्यानं आणखी एक चित्रपट साइन केला. त्यानंतर त्यानं त्याचं घर बदललं पण त्यानं त्या दयाळू मालकांचे सगळे पैसे दिल्यानंतर प्रीमियरला त्याला आमंत्रित केलं. घर बदलण्याच्या जागी त्याच्याकडे दुसरा उपाय नव्हता कारण सरदारजींच्या घरी राहणं त्याला सहन होत नव्हतं. अर्जुननं सांगितलं की माझ्याकडे दोन श्वान होते आणि मी शाकाहारी जेवण करायचो, ते नॉन-व्हेज खायचे. मी विचार करायचो माझ्या सोबत असं का होतंय? अर्जुननं म्हटलं की या प्रकारचे अनुभव महत्त्वाचे आहेत कारण त्यामुळे ग्रॅटिट्यूड शिकवतो.” 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *