Headlines

‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी सी-सेक्शनद्वारे बाळाला दिला जन्म, नावं वाचून व्हाल हैराण

[ad_1]

Bollywood Actress Delivers Baby C-Section: एखाद्या मुलीसाठी आई होणे हे कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाही. त्या काळात ती स्वत: ची आणि हेणाऱ्या बाळाची अधिक काळजी घेत असते. बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फॅशन सेन्स (Fashion) आणि स्टाइलमुळे (Style) अनेकदा चर्चेत असतात. अभिनेत्रींमुळे वैयक्तिक आयुष्य आणि आवडीनिवडीही गॉसिप कॉरिडॉरमध्ये चर्चेचा विषय बनतात. जेव्हा एखादी बॉलीवूड अभिनेत्री प्रेगन्नेंट (Pregnant) असते तेव्हा डाइट (Diet) आणि व्यायामात (Exercise) शक्य ते बदल केले जातात. कारण प्रसूतीच्या काळात त्रास होऊ नये.

 

काही प्रकरणांमध्ये नॉर्मल डिलिव्हरीऐवजी त्यांना सिझेरियन प्रसूतीचा अवलंब करावा लागतो असे सांगितले जाते. अलीकडेच आलिया भट्टने बाळाला जन्म दिला आहे. आलिया भट्टची डिलिव्हरी (Delivery) सी-सेक्शनच्या (C-Section) माध्यमातून झाल्याचे वृत्त आहे. अशाप्रकारे, सी-सेक्शन फक्त अशा महिलांना दिले जाते ज्यांना सामान्य प्रसूतीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या जाणवते. सी-सेक्शनच्या माध्यमातून कोणत्या सेलेब्सनी (Celebrity) मुलांना जन्म दिला आहे ते जाणून घेऊया. (famous bollywood actress gave birth to a baby through c section you will be shocked nz) 

1. शिल्पा शेट्टी (Shipa shetty)

या यादीत बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे. शिल्पाने 2009 मध्ये राज कुंद्रासोबत लग्न केले आणि सी-सेक्शन प्रक्रियेनंतर तिला एक मूल झाले. मुलाला जन्म दिल्यानंतरही शिल्पा शेट्टी फिटनेसच्या बाबतीत मोठमोठ्या हिरोइन्सशी स्पर्धा करते.

2. करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) 

करीना कपूर तिच्या फिटनेस आणि स्टाईलसाठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. तैमूर (Taimur) आणि जेह (Jeh) या दोन्ही बाळाच्या जन्मावेळी करिनाने सी-सेक्शन केले होते.

3. नेहा धूपिया (Neha Dhupia) 

अभिनेत्री नेहा धुपियाला दोन मुले आहेत. असे वृत्त आहे की नेहा धुपियाला तिच्या दुस-या मुलाच्या जन्मादरम्यान काही गुंतागुंत झाल्यामुळे तिचे सी-सेक्शन झाले होते.

हे ही वाचा – T-Series च्या मालकाला Nora Fatehi करते डेट? सोशल मीडिया पोस्टमुळे एकच खळबळ

 

4. सानिया मिर्जा (Sania Mirza)

टेनिस स्टार सानिया मिर्झाचे मुलाच्या जन्माच्या वेळी सी-सेक्शन झाले होते. सानियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, सी-सेक्शननंतर तिला काही महिने हेवी वर्कआउट किंवा ट्रेनिंग करण्याची परवानगी नव्हती.

5. आलिया भट्ट (Alia Bhatt)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी त्यांच्या बाळंतपणासाठी सी-सेक्शन निवडले. आलिया भट्टला काही दिवसांपूर्वी मुलगी झाली.

6. भारती सिंह (Bharti singh)

भारती सिंह यांनीही सी-सेक्शनद्वारे मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर दोन-तीन दिवसांनीच भारती शूटिंगला (Shooting) परतली.

7. मलायका अरोरा (Malaika Arora)

बॉलिवूडची ‘मुन्नी’ उर्फ ​​मलायका अरोराने सुपरस्टार सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खानशी लग्न केले. मलायकानेही सी-सेक्शन अंतर्गत मुलाला जन्म दिला आहे. आजही मलायका तिच्या फिगरमुळे तरुण दिसते त्यामागे मुख्य कारण व्यायाम आणि डाइट. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *