Headlines

Oops Moment : कार्यक्रमा सुरु असताना Sonam Kapoor च्या ब्लाऊजचं बटन अचानक…. व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Sonam Kapoor Oops Moment : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम ही तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. इतकंच काय तर तिला बॉलिवूडची फॅशननिस्टा असं अनेक लोक बोलतात. बऱ्याच वेळा फॅशनच्या नादात अभिनेत्री काही तरी करून जातात. यात सोनमचं नाव हे अव्वल स्थानी आहे. सोनम बऱ्याचवेळा तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. दरम्यान, नुकताच सोनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फॅशन करणं तिला कशा प्रकारे महागात पडलं आहे ते दिसतयं. सोनम ही Oops Moment ची शिकार झाली आहे. 

अभिनेता अनिल कपूर (anil Kapoor) यांची लाडकी लेक सोनमनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती, तेव्हाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात सोनमनं प्रिंटेड काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसली. त्यावेळी सोनमनं फ्रंट ओपण साडीला मॅच होणारं शर्ट ब्लाऊज परिधान केलं होतं. दरम्यान, संपूर्ण कार्यक्रमात ती तिचे कपडे सावरताना दिसली. तर सोनम जेव्हा तिचं स्पीच देण्यासाठी उभी राहिली तेव्हा साडीत पाय अडकून ती पडणार होती पण तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिला सावरले. (Sonam Kapoor Oops Moment) 

हेही वाचा : ‘फुकटमध्ये मला युज केलं आणि…’, Manasi Naik चा पतीविषयी धक्कादायक खुलासा

आता सोनम कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार्यक्रमाच्या मध्ये सोनम कपूरच्या शर्टची बटणेही उघडली होती. मात्र, त्यावेळी कसं तरी सोनमनं सगळं सावरलं. सोनम Oops Moment ची शिकार झाली. सोनमचा हा आताचा व्हिडीओ नाही तर आधीचा व्हिडीओ आहे. 

सोनमनं काही दिवसांपूर्वीच एका मुलाला जन्म दिला. सोनम आणि तिचा पती आनंद आहूजानं (anand ahuja) मुलाला वायू कपूर आहूजा असं नाव दिलं आहे. सोनम आणि आनंद हे 8 मे 2018 रोजी लग्न बंधनात अडकले. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सोनम आणि आनंद लग्न बंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

सोनमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनमनं पती आनंदसोबत एक थ्रोबॅक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सोनमनं कॅप्शन दिलं की ‘तुझी तुलना कोणाशीही होऊ शकत नाही… आणि मी तुला मिस करते. आपल्याला एकत्र 7 वर्षे पूर्ण झाली.’ सोनमनं शेअर केलेली पोस्ट पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले.

सोनमनं शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या. पण सगळ्यां कमेंट्स पेक्षा सगळ्यांचे लक्ष हे सोनमचा पती आनंदच्या कमेंटनं वेधले आहे. सोनमच्या पोस्टवर कमेंट करत आनंद म्हणाला, ‘सोना. मे महिन्यात सात वर्षे होतील… आपण पहिल्या डेटपासून मोजायला सुरूवात करू ना..? तेव्हापासून नाही जेव्हापासून आपण फोनवर बोलायला लागलो…’ या पोस्टमुळे सोनमचा तारखांच्या बाबतीत गोंधळ झाला असे कळले आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *