Headlines

विजय देवरकोंडा नव्हेतर अल्लू अर्जून रश्मिका मंदान्नाच्या प्रेमात; सगळ्यांसमोर म्हणाला…

[ad_1]

मुंबई :  गीता गोविंदम’, ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘पुष्पा: द राइज’ यांसारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदान्नाला नॅशनल क्रशचा टॅग मिळाला असला तरी अल्लू अर्जुनने तिला नवा टॅग दिला आहे. पुष्पाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अल्लू अर्जूनने अभिनेत्रीला नवीन टॅग दिला आहे.  पुष्पा: द राइजचं प्रमोशन करताना, तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनने खुलासा केला की त्याने नॅशनल क्रश रश्मिकाला ‘कृष्णिका’ म्हटलं.

अभिनेत्याने सांगितलं की, ‘मी रश्मिका मंदानाला क्रश्मिका या नावाने हाक मारतो. आम्ही बर्‍याच लोकांसोबत काम करतो मात्र त्यांच्यापैकी फार कमी लोक आहेत ज्यांना आम्हाला खूप आवडते किंवा आम्ही प्रेम करू शकतो. मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यापैकी एक रश्मिका आहे. ती खूप गोड आहे, खूप साधी आहे, खूप सुंदर आहे,  आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती खूप जास्त हुशार मुलगी आहे.

अल्लू अर्जुन पुढे म्हणला, ‘रश्मिका आधीच तिच्या स्पर्धेत अव्वल आहे तिच्यात असलेल्या क्षमतांमुळे ती आणखी बरंच काही करू शकते असं मला वाटतं. मला विश्वास आहे की, ती येत्या काही वर्षांत योग्य चित्रपट आणि योग्य दिग्दर्शकांसह तिची अधिक कौशल्यं दाखवू शकेल. ती एक उत्कृष्ट कलाकार आहे. मी रश्मिकाला शुभेच्छा देतो.

नॅशनल क्रश रश्मिकाने ‘चलो’ आणि ‘गीता गोविंदम’ यांसारख्या सिनेमांद्वारे साऊथ फिल्म इंडस्ट्रीत महत्त्वाचा ठसा उमटवला आहे. तिने कार्ती-स्टार ‘सुलतान’ मधून तमिळमध्ये पदार्पण केलं आणि सध्या ती ‘पुष्पा: द राइज’ द्वारे प्रसिद्धी मिळवत आहे.

रश्मिका पुन्हा एकदा अल्लू अर्जुनसोबत पुष्पा: द राइज, पुष्पा: द रुलच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनूमध्येही दिसणार आहे. ती शेवटची थलपथी विजयसोबत ‘वारीसु’मध्ये दिसली होती.

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना Rashmika Mandanna  सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाची ‘श्रीवल्ली’ बनून तिने असं स्थान निर्माण केलं आहे की, तिने हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांच्या हृदयातही स्थान निर्माण केलं आहे. यामुळेच आता तिने बॉलिवूडमध्येही धमाकेदार पदार्पण केलं आहे. ‘गुडबाय’ या चित्रपटातून ती अमिताभ बच्चन यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *