Headlines

एकदोन नव्हे, तब्बल 28 वर्षे लहान मुलीला Nawazuddin Siddiqui नं Kiss करताच व्हिडीओ तुफान व्हायरल

[ad_1]

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांचा आगामी चित्रपट टीकू वेड्स शेरू चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच कॉन्ट्रोव्हर्सीचा एक भाग झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 49 वर्षांचा नवाजुद्दीन सिद्दीकी आणि 21 वर्षांच्या अवनीत कौरचा किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. त्यांच्या या किसिंग सीननं सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर लोक फक्त नवाजुद्दीनी सिद्दीकी, अवनीत कौर नाही तर त्यांच्यासोबत निर्माती कंगना रणौतला देखील ट्रोल करत आहे. 

टीकू वेड्स शेरू या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि 21 वर्षांची अवनीत कौर यांच्यातल्या लिपलॉकच्या सीननं सगळे संतापले आहेत. टीकू वेड्स शेरू हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कास्टिंगवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. लोकांचे म्हणणे आहे की दोघांच्या वयात खूप फरक आहे. त्यावर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  

हा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर यावर चांगलीच चर्चा सुरु केली आहे. एक नेटकरी म्हणाला, अवनीत, नवाज पेक्षा 28 वर्षांनी लहान आहे. ती त्याच्या मुलीच्या वयाची आहे. या लोकांना थोडी पण लाज नाही काय? दुसरा नेटकरी म्हणाला, मला कळत नाही अवनीतनं काय विचार केला आणि नवाजुद्दीनसोबत असलेल्या या कास्टिंगला होकार दिला. तिसरा नेटकरी म्हणाला, ‘बापलेक वाटत आहेत दोघेही, त्यातही दोघांचा किसिंग सीन, अनर्थ झाला.” आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ही अभिनेत्री आपल्या वडिलांच्या वयाच्या अभिनेत्याबरोबर काय करतेय’. दुसरा नेटकरी म्हणाला,  ‘एवढ्या लहान मुलीबरोबर तिच्या वडिलांच्या वयाचे अभिनेते कसे काम करतात’. तिसरा नेटकरी म्हणाला, ‘कंगनाने बीएमसीकडून परवानगी घेतली असेल’. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अवनीतला ट्रोल केले आहे. 

हेही वाचा प्रदर्शनाच्या आधीच Adipurush ची बुकिंग साइट क्रॅश, दिल्लीत 2200 ते इतर मेट्रो सिटिजमध्ये तिकिटांचे दर काय?

या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म आहे. या चित्रपटात दोन अशा लोकांची कहाणी दाखवण्यात आली आहे ज्यांना कलाकार व्हायचे असते. त्यांचं हे स्वप्न घेऊन ते मुंबई आलेले असतात. चित्रपटात शिराज उर्फ शेरू हा भोपालचा असून त्याचं स्वप्न घेऊन मुंबईत पोहोचतो आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही मार्ग शोधत असतो. पण दुसरीकडे टीकूचं देखील असचं स्वप्न असतं पण दोघांची जी प्लॅनिंग आहे ती वेग वेगळी असते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *