Headlines

Narayan Rane on Maharashtra govt transferring probe in 2020 Palghar mob lynching case to CBI msr 87

[ad_1]

राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या पालघर साधू हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आले. राज्य सरकारच्या निर्णयावर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Palghar Mob Lynching Case : महाराष्ट्र सरकार तपास सीबीआयकडे सोपवण्यास तयार

या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आले पाहिजे. असं नारायण राणेंनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

या प्रकरणात याआधी साधारण २०० लोकांना अटक करण्यात आली होती. पुढे नोव्हेंबर २०२२ मध्ये अटक करण्यात आलेल्या ५८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तर डिसेंबर महिन्यात यातील ४७ आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. याआधी आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी सीआयडीने ८०८ संशयितांची चौकशी केली होती. तसेच १०८ साक्षीदारांचा जबाब नोंदवला होता.

नेमकं प्रकरण काय आहे? –

१६ एप्रिलच्या २०२२ रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. यातील ११ आरोपी अल्पवयीन होते. तसेच या हत्याप्रकरणात पाच पोलिसांचे निलंबन तर ३० हून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *