Headlines

‘मेरे पति कल रात से गायब हैं…’, Deepika Padukone च्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

[ad_1]

Ranveer singh and Deepika Padukone : बॉलिवूड पावर कपल म्हणून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ओळखले जातात. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. त्या दोघांचे जे चित्रपट आले ते बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. दरम्यान, आता पुन्हा एकदा ते दोघं एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

हा व्हिडीओ रणवीरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला दीपिका पोलीस स्टेशनला असून अधिकाऱ्याला सांगताना दिसते की ‘मेरे पति कल रात से गायब हैं।’ त्यानंतर लगेच व्हिडीओत रणवीर सिंग दिसतो. रणवीर यावेळी हॅन्ड फ्री डिव्हाइसमध्ये ‘द फॅमिली मॅन’ मधील चेल्लम सरांशी बोलताना दिसतो. तेव्हा रणवीर बोलतो की सर, टार्गेट मिळाल. त्यानंतर रणवीर त्याचा पाठलाग करू लागतो. तर त्यानंतर मागून चेल्लम सर बोलतात की , ‘एजेंट, जा, जा, जा’. पण यावेळी रणवीर नाही तर दाक्षिणात्य अभिनेता राम चरण धावताना दिसतो. दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये त्रिशा असल्याचे दिसते. व्हिडीओच्या शेवटी रणवीर सिंग एका व्यक्तीला प्रश्न विचारताना दिसतो की बोल…! 

हा व्हिडीओ शेअर करत रणवीरनं कॅप्शन दिलं आहे की “काही सीक्रेट्स हे सीक्रेट्स रहायला हवेत. काही प्रश्नांची उत्तर न देणं चांगलं असतं. काही कोडी ही न सोडवलेलीच चांगली असतात. लवकरच येणार आहे… रणवीर सिंगनं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की सीक्रेटचा खुलासा… सीक्रेट विषयी जाणून घेण्यासाठी प्रतिक्षा करा.” त्यासोबतच त्यानं #Showmethesecret असं हॅशटॅग दिलं आहे. तर सगळ्यात शेवटी रणवीरनं #collab हे हॅशटॅग वापरलं आहे. 

 हेही वाचा : Don 3 मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार Ranveer Singh !

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला की अपकमिंग चित्रपटातील सीन आहे वाटतं. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की ही एक जाहिरात असू शकते किंवा चित्रपट नक्की काय हे जाणून घेण्यासाठी आतुर आहे. 

दरम्यान, रणवीरच्या कामाविषयी बोलायचं जालं तर तो लवकरच करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत असेल. तर त्यासोबत काही दिग्गज कलाकार आहेत त्यात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी दिसणार आहेत. दीपिका विषयी बोलायचे झाले तर ती प्रभासच्या ‘प्रोजेक्ट के’ आणि हृतिकच्या ‘फायटर’मध्ये देखील दिसणार आहे. तर राम चरण हा ‘गेम चेंजर’ मध्ये दिसणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *