Headlines

‘मुलूख माझा, हुकूम माझा अन्…’, राज ठाकरेंनी सांगितली अठरापगड आरोळ्यांची गोष्ट, टिझर पाहिला का?

[ad_1]

Raj Thackeray : संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि स्वराज्यातील मावळ्यांच्या पराक्रमावर विविध चित्रपट तयार होत आहेत. या चित्रपटांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळताना पहायला मिळतोय. अशातच आता हर हर महादेव या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. उत्तम कलाकार आणि जबरदस्त गाण्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच चित्रपट आणखी खास बनलाय, तो राज ठाकरे यांच्यामुळे….

अभिजीत देशपांडे यांचं उत्तम दिग्दर्शन आणि झी स्टुडिओ निर्मिती असलेल्या हा सिनेमा शिवचरित्रावर उजाळा देताना पहायला मिळतो. या सिनेमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज देण्यात आला आहे. मनसेच्या अधिकृत पेजवरून या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे.

“जेव्हा सह्याद्रीला कणा नव्हता, मराठीला बाणा नव्हता… ही साडेतीनशे वर्षानंतरच्या पहाट फुटीची गोष्ट आहे. ही अठरा पगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे… हर हर महादेव”, असा राज ठाकरे आवाज राज ठाकरे यांनी चित्रपटात दिला आहे.

Aryan Khan असं का वागला Ananya Panday सोबत? सगळ्यांसमोरच केलं….

हर हर महादेव चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याने सर्वांना उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट फक्त मराठीतच नाही तर इतर 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *