Headlines

‘मी तिला बेडरुममध्ये..’ Rape सीनवरुन अभिनेत्याचं वादग्रस्त विधान! अभिनेत्री शपथ घेत म्हणाली…

[ad_1]

South Indian Actress Angry Vow Not To Work With This Actor: दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या तलापती विजयच्या ‘लियो’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाने तिकीटबारीवर विक्रमी कामगिरी केली आहे. केवळ तलापती विजयचे चाहतेच नाही तर अनेक समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटामधील प्रमुख अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या एका वेगळ्याच वादामुळे चर्चेत आहे. 

कधीच एकत्र काम न करण्याची शपथ

तृषा कृष्णनने दाक्षिणात्य अभिनेते मंसूर अली खान यांनी आपल्याबद्दल ‘नीच आणि घृणास्पद पद्धतीने’ भाष्य केलं आहे असं म्हणत टीका केली आहे. इतक्यावरच तृषा थांबलेली नाही तर यापुढे आयुष्यात कधीच आपण मंजूर अली खान यांच्याबरोबर काम करणार नाही अशी शपथही तिने खाल्ली आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी तृषाची बाजू उचलून धरत दाक्षिणात्य अभिनेते मंजूर अली खान यांना झापलं आहे.

नेमकं काय म्हणाला हा अभिनेता?

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, मंसूर यांनी एका मुलाखतीमध्ये कथित पद्धतीने, ‘जेव्हा मला तृषा माझ्याबरोबर अभिनय करत आहे असं समजलं. तेव्हा एक बेडरुम सीन हवा असं मला वाटलं. मी तिला बेडरुममध्ये तशाच पद्धतीने नेलं असतं जसं (सीनमध्ये) मी ठरवलं होतं,’ असं विधान केलं. यावर ‘लिओ’च्या दिग्दर्शकानेही नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. आता अभिनेत्री तृषा कृष्णननेही संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री संतापून म्हणाली, ‘फार घाणेरडी आणि घृणास्पद…’

तृषाने तिच्याबद्दल मंसूर यांच्याकडून करण्यात आलेल्या विधानावर सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. तृषाने आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन प्रतिक्रिया देताना, “नुकताच एक व्हिडीओ माझ्या पाहण्यात आला. यामध्ये मंसूर अली खान माझ्याबद्दल फार घाणेरडी आणि घृणास्पद विधानं करताना दिसत आहेत. मी या विधानांची कठोर शब्दांमध्ये निंदा करते. ही विधानं लैंगिक भेदभाव करणारी, अपमानकारक, स्त्रियांचा द्वेष करणारी, घृणास्पद आणि घाणेरडी आहेत. ते इच्छा व्यक्त करु शकतात मात्र मी आभारी आहे की मी त्याच्यासारख्या वाईट व्यक्तीबरोबर कधी स्क्रीन स्पेस शेअर केली नाही. तसेच मी हे सुद्धा सुनिच्छित करु इच्छिते की भविष्यातही माझ्या कोणत्याही चित्रपटामध्ये असं होणार नाही. अशा लोकांमुळे सर्वांचेच नाव खराब होतं,” असं म्हटलं.

सध्या या प्रकरणावरुन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये मोठा वाद सुरु असतानाच आता तृषाने पहिल्यांदाच यासंदर्भात भाष्य केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *