Headlines

‘मी फार गांभीर्याने घेत नाही,’ Ghoomer चा ट्रेलर पाहून सेहवाग स्पष्टच बोलला; अभिषेक म्हणाला ‘तुला फार..’

[ad_1]

Abhishek Bachchan to Sehwag: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैय्यामी अखेर (Saiyami Kher) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘घुमर’ (Ghoomer) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर अनेकांना आवडला असून अभिषेक आणि सैय्यामी यांचं कौतुक केलं जात आहे. आर बल्की यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, 18 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असून, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही आवडला आहे. 

घुमर हा एका महिला गोलंदाजावर आधारित चित्रपट आहे, जी भारतीय संघात आपलं स्थान निर्माण करते. पण एका अपघातात ती आपला उजवा हात गमावते आणि तिच्यावर आभाळ कोसळतं. यानंतर तिच्यासमोर येणारी आव्हानं, नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अभिषेक बच्चनने चित्रपटात तिच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागलही (Virender Sehwag)) हा ट्रेलर खूप आवडला आहे. दरम्यान, त्याने या ट्रेलरवर व्यक्त होताना एक ट्वीट केलं आहे, जे चांगलंच व्हायरल झालं आहे. आपण कधीच फिरकी गोलंदाजांना गांभीर्याने घेतलं नाही, पण घुमर विशेष वाटतोय असं त्याने म्हटलं आहे. 

सेहवागने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “मी कधीच फिरकी गोलंदाजांना गांभीर्याने घेतलं नाही, पण घुमर विशेष वाटतोय असं त्याने म्हटलं आहे. चित्रपट पाहण्याची वाट पाहत आहे. सुंदर #GhoomerTrailer”. विरेंद्र सेहवागच्या या ट्विटला अभिषेक बच्चननेही उत्तर दिलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तू नक्कीच गांभीर्याने घेशील असं अभिषेकने म्हटलं आहे. 

अभिषेक बच्चनने ट्वीटला उत्तर देताना म्हटलं आहे की, “Hahaha…तू चित्रपट पाहिल्यानंतर तिला फार गांभीर्याने घेशील. आश्वासन! धन्यवाद. तुला ट्रेलर आवडला याचा फार आनंद आहे”. 

सौरव गांगुलीने ट्रेलरला “उत्कृष्ट” म्हटलं आहे. त्याने घूमरच्या सर्व कलाकार आणि टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिलं आहे की, “माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक… अभिषेक… ट्रेलर छान दिसतोय…संपूर्ण चित्रपटाची वाट पाहत आहे…प्रत्येकाने पहावे… देव आशीर्वाद देवो आणि संपूर्ण कलाकार आणि टीमला शुभेच्छा. ” अभिषेक बच्चनने त्याचेही आभार मानले आणि प्रत्युत्तर दिले. “माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एकाकडून येणे ही खूप प्रशंसा आहे. खूप खूप धन्यवाद दादा,” असं अभिषेकने म्हटलं.

अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्यासह ‘घूमर’मध्ये शबाना आझमी आणि अंगद बेदी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 18 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

दरम्यान अमिताभ बच्चन यांनीही मुलाच्या नव्या चित्रपटासंबंधी उत्सुकता दाखवत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. घुमर चित्रपट मेलबर्नमधील इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *