Headlines

माजी क्रिकेटपटू इरफान पठाणची उदयपूर प्रकणावर प्रतिक्रिया; ट्वीट वाचून चाहत्यांचा संताप, म्हणाले…

[ad_1]

Irfan Pathan tweet on Udaipur Tailor Murder: राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका टेलरची हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल हत्याकांडातील दोन्ही आरोपींना राजसमंद येथून अटक करण्यात आली आहे. हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण पाहता संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण याने ट्वीट करून या घटनेचा निषेध केला आहे. मात्र असं असताना चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

इरफान पठाण ट्वीटमध्ये काय म्हणाला?

उदयपूरमधील टेलरच्या हत्येबाबत माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने ट्विटरवर लिहिले की, ‘तुम्ही कोणत्या धर्माचे पालन करता याने काही फरक पडत नाही. एखाद्या निष्पाप व्यक्तीला इजा करणे म्हणजे तुम्ही संपूर्ण मानवतेचे नुकसान करत आहात.’

इरफानच्या ट्वीटवर चाहत्यांचा संताप

इरफान पठाणने आपल्या ट्वीटमध्ये धर्माचे नाव घेतल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांनी इरफान पठाणला धर्माचे नाव घेण्याचा सूचना केली आहे.

उदयपूरमधील हत्येप्रकरणी गृह मंत्रालयाची कारवाई

उदयपूरमधील या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयही कारवाई करत असून या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. यासाठी पाच अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणात कोणतीही संघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंध असतील तर त्याची सखोल चौकशी केली जाईल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *