Headlines

“माझा जन्म कृष्ण जन्माष्टमीला झाला, मला देवानेच पाठवलं,” अरविंद केजरीवाल यांच्या विधानाची चर्चा | born on Krishna Janmashtami sent by God to finish off Kansa descendants said arvind kejriwal in gujarat

[ad_1]

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीत आप पक्षाने उडी घेतली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सक्रिय होऊन येथे पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. मात्र गुजरातमधील काही भागात अरविंद केजरीवाल हे हिंदू विरोधी असल्याचा प्रचार केला जात आहे. तशा आशयाचे काही बॅनर्सही येथे झळकले आहेत. याच बॅनरबाजीच्या पार्श्वभूमीवर माझा जन्म श्रीकृष्ण जन्माष्टमीला झालेला असून कंसाची विचारधारा असणाऱ्यांना संपवण्यासाठीच मला देवाने पाठवले आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> बॉलिवूडमध्ये मुस्लीम समाजाचे सर्वाधिक योगदान, शरद पवारांचे विधान

माझा जन्म श्रीकृष्ण जन्माष्टमीला झाला असून देवानेच मला पाठवले आहे. कंसासारखे विचार असणाऱ्यांना संपवण्यासाठीच मला देवाने पाठवले आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

गुजरातमध्ये ठिकठिकाणी केजरीवाल यांच्याविरोधात पोस्टर्स

गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप पक्षाने येथे प्रचाराला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून अरविंद केजरीवालही गुजरातला सातत्याने भेट देत आहेत. ते शनिवारपासून (८ ऑक्टोबर) गुजरातच्या २ दिवसीय दौऱ्यावर आहेत. असे असताना गुजरातमधील अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा येथे केजरीवाल यांना विरोध दर्शविणारे बॅनर्स झळकले आहेत. केजरीवाल परत जा, केजरीवाल हे हिंदूविरोधी आहेत, अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत.

हेही वाचा >>> दसरा मेळाव्यात भाषण करू न दिल्यामुळे शिंदे गटात नाराजी? उदय सामंतांनी नेमकं सांगितलं; म्हणाले…

अरविंद केजरीवाल यांना का विरोध होत आहे?

काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे धर्मांतराचा मोठा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची एक व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. या कार्यक्रमाला आप पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मंत्री राजेंद्र पाल गौतम उपस्थित होते. या कार्यक्रमात “ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यावर माझी श्रद्धा नाही, मी त्यांची पूजाही करणार नाही. देवाचा अवतार मानला जाणारे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावरही माझी श्रद्धा नाही आणि त्यांचीही पूजा करणार नाही,” अशी शपथ घेण्यात आली होती. याच कारणामुळे अरविंद केजरीवाल यांना गुजरातमध्ये विरोध होत असून ते हिंदूविरोधी आहेत, असा दावा केला जातोय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *