Headlines

महाराष्ट्राचे राजकारणी गलिच्छ म्हणत कोकण हार्टेड गर्ल भावूक

[ad_1]

Kokan Hearted Girl : गेल्या महिन्यात मुंबईतल्या परळ इथल्या के ई एम रुग्णालयात (KEM Hospital) एक मोठी घटना घडली. नवजात सहा महिन्यांच्या बाळाचं वजन हे फक्त 1 किलो 26 ग्राम होतं. त्याचं वजन खूप कमी असल्यानं त्याला नवजात शिशू दक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी बाळाच्या हाताला सहाईन लावण्यात आली. मात्र, सलाईनमधून देण्यात येत असलेल्या औषधांमुळे बाळाचा हात काळा पडू लागला होता. आईनं डॉक्टरांकडे तक्रार केल्यानंतरही त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. पण दिवसागणिक बाळाचा हात खूपच काळा पडू लागला आणि त्याच्या हाताची बोटं वाकडी झाली. बाळाच्या हाताला संसर्ग बळवला होता. त्यामुळे कोपरापासून बाळाचा हात डॉक्टरांना कापावा लागला. त्यावर आता सगळ्यांची लाडकी आणि सोशल मीडिया कॉन्टेन्ट क्रिएटर कोकण हार्टेड गर्लनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

कोकण हार्टेड गर्लनं तिच्या युट्यूब अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती सुरुवातीला म्हणते की ‘काही दिवसांपूर्वी मी KEM Hospital वर एक व्लॉग शेअर केला होता. त्यानंतर मला अनेकांचे मेसेज आले अनेकांनी मला मनसेची पीआर देखील म्हटले. त्यात मला इन्स्टाग्राम अकाटवरून एका मुलीचे मेसेज होते. त्या मेसेजमध्ये तिनं बाळाचा फोटो शेअर केला होता आणि तिच्यासोबत काय झालं ते सांगितलं. त्यात त्या मुलीनं सांगितलं होतं की 19 जून रोजी बाळाचा जन्म झाला, बाळ प्री मॅच्युअर होतं. त्यामुळे त्याच्यावर ट्रिटमेंट सुरु होती. त्याला आयव्ही लावण्यात आली. त्यानंतर बाळाच्या आईनं तिथे असलेल्या अभिलाशा या डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर त्या डॉक्टर म्हणाल्या की त्यानं काही होत नाही. काही तासांनंतर किंवा दुसऱ्या दिवशी आयव्ही तशीच असल्यामुळे बाळाचा हात काळा पडला. दुसऱ्या डॉक्टरांनी ती आयव्ही काढली. त्यानंतर बऱ्याच हालचाली झाल्या. त्याबाळाचा हात आता निकामी झाल्यामुळे त्याचा हात काढून टाकण्यात येतोय आणि आज त्याचं ऑपरेशन होतं.’ 

याविषयी आणखी सांगताना पुढे अंकिता वालावलकर म्हणाली, ‘त्या बाळाच्या वडिलांशी मी बोलत असताना ते रडक्या आवाजात बोलत असताना ते म्हणाले मॅडम तुम्हाला काय सांगू मी कोणत्या परिस्थितून जातोय. एक गरीब रिक्षावाला आज त्याच्यावर ही वेळ आली आहे. प्रत्येकवेळी डॉक्टरांना दोश देऊ शकत नाही. मला अनेकांनी सांगितलं होतं की डॉक्टरांची एक बाजू असते. त्यामुळे डॉक्टरांची बाजू ऐकण्यासाठी मी तिथे गेले. मी NICU या डिपार्टेमेंटच्या एचओडी होत्या अनिता मॅम त्यांना भेटले त्यांनी मला उडवा- उडवीची उत्तर दिली. तू कोण आहेस आणि मी तुला का सांगू? असे त्यांनी सवाल केले. मी एक सोशल वर्कर आहे असं समजा असं म्हटल्यानंतर  त्यांनी मला माझं डेझग्नेशन आणि आयडी विचारण्यास सुरुवात केली. त्यांच्या बाजून ते योग्य आहे. मला उत्तर देणं गरजेचं नाही आहे. कोणाला ही असं का सांगणार. पण त्या उद्धटपणे माझ्याशी बोलल्या. मला फक्त त्यांची बाजू जाणून घ्यायची होती.’ 

पुढे अंकिता म्हणाली, ‘बाळाच्या आई-वडिलांशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर आम्हाला म्हणाले की त्यांची चूक आहे, त्यांच्या चुकीमुळे हे सगळं झालं आहे. पण त्यांनी असं काही लेखी स्वरुपात दिलेलं नाही. मात्र, आता बाळाचा हात कापण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही आहे. गरीब असल्यामुळे ते सरकारी रुग्णालयात गेले आणि त्यामुळे तिथे ते ट्रिटमेंट घेत होते. मी खूप भावूक झाले. मी खाली येऊन रडत असताना तिथे एक व्यक्ती आली आणि ती म्हणाली ताई तू रडू नकोस. तू मनसेला कॉन्टॅक्ट कर… मी म्हटलं की मनसेला का कॉन्टॅक्ट का करू मी… तुमच्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा तुम्हाला मनसे आठवते. मग जेव्हा निवडणूक येते तेव्हा का नाही आठवत… म्हणून मी का जाऊ मनसेकडे कारण मागच्यावेळी अनेकांनी ही मनसेची पीआर आहे असं म्हटले होते.’ 

हेही वाचा : KEM रुग्णालयाच्या चुकीची शिक्षा 52 दिवसांच्या बाळाला, ‘हात गेला बाळ तरी सुखरूप द्या’ पालकांचा टाहो

पुढे इतर पक्षांना मदतीसाठी चॅलेन्ज करत अंकिता म्हणाली, ‘या गरीब रिक्षावाल्याला मदत करण्यासाठी जो कोणी पक्ष पुढे येईल. त्याचं मी प्रमोशन करेन… भाजप असू दे, नवीन शिवसेना, जूनी शिवसेना, नवीन राष्ट्रवादी, जूनी राष्ट्रवादी कोणीही या मनसे पक्ष सोडून कोणीही या पुढे… कोणीही या गरीब रिक्षावाल्याला मदत करा. जो डॉक्टर दोषी असेल त्याला शोधून काढा… त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी. कारण शिकाऊ डॉक्टर एका बाळावरती एक्सपेरिमेन्ट नाही करू शकतं. एका गरीब रिक्षावाल्याचं बाळ आहे ते… काय करणार आहे तो माणूस आहे त्याला काय वाटत असेल. मी सकाळी आठ वाजेपासून आहे यामागे मी याच्यावर विचार केला निघाले… मी रुग्णालयात आले डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तर दिलीत… कारण डॉक्टरांची एक युनियन असते. आजजर मी मनसेची मदत घेतली आणि काही अॅक्शन घेतली. तर आपल्या महाराष्ट्राचे राजकारणीच इतके गलिच्छ आहेत ना की सगळ्या डॉक्टरांना स्ट्राईकवर जाण्यास सांगतिल. डॉक्टरही जातील आणि त्याला जबाबदार ठरवतील कोकण हार्टेड गर्ल आणि मनसे पक्षाला. ते हाल आपण नाही करून घेऊ शकत. त्यामुळे मी यावेळी मनसे पक्षाचा आधार घेतलेला नाही आहे. आता मला त्या सगळ्या राजकारणांना चॅलेन्ज द्यायचं आहे. जे गेल्यावेळी बोलत होते की आम्ही या पक्षाचे आहोत आम्ही मदत केली असती… करा. कोणीही मदत करा. आज त्या गरीब रिक्षावाल्याला न्याय मिळू देत. जो डॉक्टर जबाबदार आहे त्याला शिक्षा मिळू देत. कोणत्याही पक्षाकडून होत असेल तर होऊ देत.’ 

हेही वाचा : वजन वाढल्याने भाजीवालेही करायचे ‘या’ अभिनेत्रीची टिंगल; Looks मुळे ती मिडीयासमोर जाण्यासही घाबरायची

पुढे महाराष्ट्रात्या राजकारणाविषयी बोलताना अंकिता म्हणाली, ‘आपल्या महाराष्ट्राचं राजकारण फार गलिच्छ आहे. ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कोण कधी कुठच्या थराला जाईल. हे सांगता येत नाही… अशा वेळी मी रिस्क घेऊ शकत नाही. कारण मला एका विषयी वाटतंय त्याच्यामुळे हजारो रुग्णांवर परिणाम होईल कारण हे लोकं कधीही अशा प्रकारचं राजकारण करायला मागे पुढे विचार करत नाही. त्यामुळे सगळ्या पक्षांना सांगते की ज्यांना मदत करायची असेल त्यांनी पुढे या. तुम्ही कमेंट करा माझ्या टीममधलं कोणीतरी असेल जे यात लक्ष घालेल. तुमच्यापर्यंत ते जे रिक्षावाले आहेत त्यांचा नंबर पोहोचवण्यात येईल. अंकितानं पुढे त्या रिक्षावाल्याशी बोलल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. मग ती म्हणाली की मी तुमच्यापर्यंत माहिती पोहचवण्याचा पर्यंत केला आहे. यावेळी मी कोणत्याही पक्षाकडे जाऊन मदत घेण्याचा प्रयत्न केला नाही आहे. मला यावेळी पाहायचं आहे की कोणता पक्ष येऊन मदत करतोय.’ 

पुढे तरुणांना सल्ला देत अंकिता म्हणाली की ‘आयुष्यात इतका पैसा कमवा की तुम्हाला कधीच सरकारी रुग्णालयात जायची वेळ येणार नाही. त्या बाळाला किती त्रास होत असेल हा विचार करून मला वाईट वाटतयं. या डॉक्टरांचे इमोशन्स मेलेले असतात. त्यांना तसं व्हावं लागतं असेल पण त्यांना याविषयी काही वाटतं नाही. यात असलेल्या प्रत्येक डॉक्टराला त्या कुटुंबाच्या वेदनेची जाणीव झालीच पाहिजे. यात आपण डॉक्टरांना दोषी ठरवू शकतं नाही, पण मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांची चूक आहे. त्याविषयी आता कोण शाहानिशा करतय ते मला पाहायचंय. कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे या मला इतकंच म्हणायचं आहे.  त्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी देवाकडे प्रार्थना…’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *