Headlines

‘लस्ट स्टोरी 2’ फेम 40 वर्षीय अंगद बेदीला 64 वर्षांच्या नीना गुप्ता यांच्यासह करायचा आहे रोमान्स, म्हणतो “त्या ज्या प्रकारे …”

[ad_1]

Angad Bedi and Neena Gupta : बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी हा ‘लस्ट स्टोरी 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री मृणाल ठाकूर सोबत दिसला आहे. या चित्रपटात मृणालच्या आजीच्या भूमिकेत नीना गुप्ता दिसल्या. तर याच नीना गुप्ता यांच्या सोबत पडद्यावर रोमान्स करण्याची इच्छा अंगद बेदीनं व्यक्त केली आहे. 

अंगद बेदी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर किंवा छोट्या पडद्यावर रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली. नीना गुप्ता यांच्यासोबत बराच वेळ व्यथित केला. तर अंगद म्हणाला “नीना गुप्ता ज्या प्रकारे त्यांच्या भूमिका निवडतात हे खरंच इम्प्रेसिव्ह आहे. याचवेळी अंगदनं नीना गुप्ता यांच्यासोबत ऑनस्क्रिन रोमान्स करायची इच्छा असल्याचे सांगितले. अंगद त्यावेळी म्हणाला की नीना गुप्ता या एक उत्तम अभिनेत्री आहेत. अशा काही भूमिका ज्या पाहून कलाकार शिकतात त्या भूमिका त्या खूप सोप्या पद्धतीनं साकारतात. आमचं नातं वेगळं आहे, पण कधीतरी मला त्यांच्यासोबत पडद्यावर रोमान्स करायला आवडेल. मला याची आशा आहे की ही तुमच्यासाठी एक सर्वसाधारम रोमॅन्टिक स्टोरी नसेल. त्यामुळे हे कधी होईल याच्या प्रतिक्षेत आहे. मी त्यांचे काही इतर प्रोजेक्ट्स पाहिले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे बॉलिवूडनं दुर्लक्ष केलं. त्यांच्या भूमिकांना न्याय मिळाला नाही आणि आता कुठे त्यांना त्यांचं श्रेय मिळत आहे.” 

‘लस्ट स्टोरी 2’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट लस्टवर आहे. या चित्रपटात नीना गुप्ता, अंगद बेदी आणि मृणाल ठाकूर व्यतिरिक्त काजोल, कुमुद मिश्री, अमृता सुभाष हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही वेब स्टोरी तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

हेही वाचा : Hrithik Roshan – सबा आझाद लग्न करतायत? प्रेमाच्या नात्याला देणार नवं नाव

दरम्यान, हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचे कारण त्यातील बोल्ड सीन्स. अनेकांनी या चित्रपटाला पाहून हा सॉफ्ट पॉर्न आहे असे म्हटले. या चित्रपटाला पाहता अनेकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना काजोलची भूमिका आणि तिचा अभिनय आवडला तर अनेकांना नीना गुप्ता यांचा अभिनय आवडला. तर काही नेटकऱ्यांनी नीना गुप्ता यांना अशी भूमिका केल्यामुळे ट्रोल केले आहे. त्यांचे म्हणणे होते की कोणती आजी अशा गोष्टी तिच्या नातवांना सांगेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *