Headlines

Lunar Eclipse 2022: वर्षातलं शेवटचं च्रंद्रग्रहण; 12 राशींसाठी शुभ-अशुभ

[ad_1]

Lunar Eclipse 2022 Impact:  मंगळवारी वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण दिसणार आहे. म्हणून हा च्रंद्रग्रहण कोणत्या राशींसाठी शुभ आणि कोणत्या राशींसाठी अशुभ ठरणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदाच्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा परिणाम 12 राशींवर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मेष राशीतील हे चंद्रग्रहण काहींसाठी शुभ तर काहीराशींसाठी अशुभ ठरेल. जाणून घेऊया चंद्रग्रहणाचा राशींवर काय परिणाम होतो.

मेष (Aries) : स्वभावात आक्रमकता जाणवेल. कामकाजात समस्या येतील. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. व्यापारासाठी दिवस चांगला आहे. शांततेत काम करा. स्थिती सामान्य असेल.

वृषभ  (Taurus) : परदेशासोबत जोडलेल्या व्यक्तीना लाभ होणार आहे. अध्यात्माकडे कल वाढू शकतो. शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायाला वेळ द्या.

मिथुन  (Gemini) : धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उच्च पदावर बसलेल्या लोकांशी संबंध तयार होतील. नवीन पर्यायांचा विचार कराल. प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात.

कर्क (Cancer): वेतन वाढण्याची शक्यता आहे. पदोन्नती मिळू शकते. कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल. स्वतःच्या आरोग्याची आणि आपल्या वडिलांची काळजी घ्या.

सिंह (Leo) : तुमची उदारता लोकांची मने जिंकेल. सामाजिक सक्रियता वाढेल. नात्यातील तणाव, वाद टाळा. फिरायला जाऊ शकता. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना विचार करा. 

कन्या (Virgo):  काळ तणावपूर्ण आहे. पण एकाच वेळी अनेक घटना घडतील. अचानक प्रवास करावा लागू शकतो. काळजी घ्या आणि पैसे विचार करून खर्च करा. सासरच्या व्यक्तींसोबत वाद होऊ शकतात.

तुळ (Libra):  पार्टनरशिप काम करणारे लोक एकमेकांचा आदर कराआणि सामंजस्याने काम केल्यास फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणूक करू शकता. वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष द्या. तणाव टाळा.

वृश्चिक (Scorpio): वरिष्ठ सहकाऱ्यांकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. कामात यश मिळेल. करिअरमध्ये बदल करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. कायदेशीर अडचणीत अडकण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius) : मान-सन्मान वाढेल. वेतन वाढीची शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्यांना फायदा होईल. खासगी जीवनात तणाव टाळण्यासाठी जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मकर (Capricorn) : करिअरसाठी काळ चांगला आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. सरकारी कामं पूर्ण होऊ शकतात. मोठी गुंतवणूक टाळा. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ (Aquarius): आव्हानात्मक कामांची जबाबदारी दिली जाईल. पूर्वी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कौटुंबासोबत फिरायला जाण्याचा बेत आखता येईल. आरोग्याची काळजी घ्या.

मीन (Pisces) : बजेट तयार करा, अन्यथा अडचणीत येऊ शकता. कडू बोलणे टाळा. आरोग्याची समस्या असू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *