Headlines

Laptop Tips: काम करताना लॅपटॉप लवकर गरम होत असेल तर असा ठेवा कुल, पाहा टिप्स

[ad_1]

नवी दिल्ली: Laptop Tricks: शिक्षण आणि ऑफिसच्या कामासाठी अनेकदा लॅपटॉप वापर होतो. Work From Home साठी आणि ऑनलाइन अभ्यासासाठीही मोठ्या प्रमाणात वापर केल्याने लॅपटॉप खूप गरम होतो आणि यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होतो. लॅपटॉपमध्ये ही समस्या खूप गंभीर नसली तरी जास्त गरम होण्यामुळे डिव्हाइसचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हीही जर लॅपटॉप Over heating समस्येने त्रस्त असाल तर ही माहिती तुमच्या कामी येईल. आज आम्ही तुम्हाला लॅपटॉपसंबंधी काही टिप्स सांगणार आहो, ज्यामुळे तुम्ही या समस्येवर सहज मात करू शकाल. जाणून घेऊया.

वाचा: Jio- Airtel-VI युजर्ससाठी खास स्वस्त प्लान्स, सुरुवातीची किंमत १४९ रुपये, फायदे एकापेक्षा एक

लॅपटॉपला धुळीपासून वाचवा:

लॅपटॉपच्या आत वेंटिलेशन आणि हिट नियंत्रित करण्यासाठी CPU पंखे आहेत. पण, कालांतराने आणि योग्य देखभाली अभावी यावर धूळ साचते. अशा परिस्थितीत लॅपटॉपच्या आत वेंटिलेशन व्यवस्थित होत नाही. असे होऊ नये यासाठी लॅपटॉपमधील धूळ साफ करावी. यामुळे वेंटिलेशन सुधारेल आणि CPU पंखे उष्णता नियंत्रणात ठेवतील. लॅपटॉपमधील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही लॅपटॉप इंजिनिअरची मदत घेऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला लॅपटॉप हार्डवेअरचे चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही सॉफ्ट ब्रशच्या मदतीने सीपीयू आणि कुलिंग सिस्टममध्ये साचलेली धूळ स्वतः साफ करू शकता.

वाचा: महागडा स्मार्टफोनही पाण्यात होऊ शकतो खराब, Phone Waterproof आहे की नाही ‘असे’ करा चेक

लॅपटॉप चार्जर :

अनेक वेळा युजर्स लॅपटॉप दुसऱ्या चार्जरने चार्ज करतात . या परिस्थितीत, डिव्हाइस जास्त गरम होण्याची शक्यता खूप वाढते आणि लॅपटॉपमध्ये अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. तुमचा लॅपटॉप नेहमी मूळ चार्जरने चार्ज करा. अनेकदा पूर्ण चार्ज केल्यानंतरही लोक लॅपटॉपला बराच वेळ चार्जिंगमध्ये ठेवतात. अशात, लॅपटॉप जास्त चार्ज होऊ लागतो आणि खूप गरम होतो. लॅपटॉप चार्ज केल्यानंतर लगेच चार्जर बाहेर काढा.

वाचा: 5G Sim Upgrade :’या’ लिंकवर क्लिक करताच अकाउंटमधून पैसे गायब, राहा अलर्ट, करू नका ही चूक

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *