Headlines

KBC 14: 12 लाखाच्या प्रश्नावर मोहसीनने सोडला गेम, जाणून घ्या कोणता प्रश्न होता?

[ad_1]

मुंबई : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या (Kaun Banega Crorepati) हॉटसीटवर बसावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र प्रत्येकाला ती संधी मिळत नाही. एखाद दुसऱ्यांना स्पर्धकांनाच ही संधी मिळत असते. या संधीच कोणी सोन करतो, तर काहिंना खाली हातच याव लागतं. असंच एका स्पर्धकाबाबत घडलंय. या स्पर्धकाला 12 लाख 50 हजारसाठी एक सोपा प्रश्न विचारला होता. मात्र त्याला या प्रश्नाचे उत्तरच देता आले नाही आणि त्याला शोमधून बाहेर पडावे लागले. 

‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati) च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये, मजूर मोहसिन खान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर हॉटसीटवर बसला होता. मोहसिन खान या स्पर्धेत खुप चांगले खेळत होता. सुरूवातीला त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे अचूक दिली. मात्र 12 लाख 50 हजारांच्या प्रश्नावर मोहसीन अडकला आणि त्याला शोमधून बाहेर पडावे लागले होते. 

मोहसीनला हा प्रश्न विचारला? 

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मोहसीनला 12 लाख 50 हजार रूपयांसाठी हा प्रश्न विचारला होता. ‘यापैकी कोणत्या राज्याच्या हद्दीत अजून एकही राष्ट्रीय उद्यान नाही?’ या प्रश्नात 4 पर्याय होते, A- गोवा, B- केरळ, C- बिहार, D- पंजाब. मात्र, मोहसीनला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. 

लाईफलाईन असून देखील हरला

या प्रश्नापुर्वी मोहसीनजवळ एक लाईफलाईन देखील होती. शेवटच्या लाइफलाइन व्हिडिओ ए फ्रेंडच्या माध्यमातून त्याने आपल्या मित्राची यासाठी मदत मागितली होती, परंतु त्यालाही या प्रश्नाचे अचूक उत्तर माहित नव्हते. त्यामुळे मोहसीनने गेम सोडला होता. 

उत्तर काय होते?

12 लाख 50 हजार रूपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ‘डी-पंजाब’ आहे. याचे उत्तर न कळल्याने मोहसिन खानने शो सोडण्याचा निर्णय़ घेतला. त्यामुळे मोहसिनला 6 लाख 40 हजार रुपयेच घरी नेता आले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *