Headlines

“कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे….,” सेहवागनेही उडवली ‘आदिपुरुष’ चित्रपटाची खिल्ली

[ad_1]

Virender Sehwag on Adipurush: ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटावर वेगवेगळ्या कारणांमुळे टीका होत होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर टीकेचा जोर वाढला आहे. चित्रपटातील वेशभूषा, डायलॉग, व्हीएफएक्स अशा अनेक कारणांमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, चित्रपटावर टीका करणाऱ्यांमध्ये माजी भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचाही (Virender Sehwag) समावेश झाला आहे. ट्वीट करत त्याने ‘आदिपुरुष’ची खिल्ली उडवली आहे. 

सेहवागने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “आदिपुरुष पाहिल्यानंतर समजलं की, कटप्पाने बाहुबलीला का मारलं होतं”.

सेहवागने ‘आदिपुरुष’ची खिल्ली उडवताना बाहुबली चित्रपटाचा संदर्भ दिला आहे. या चित्रपटातही प्रभास प्रमुख भूमिकेत होता. 2015 मधील या ब्लॉकबस्टर चित्रपटात कटप्पा बाहुबलीला ठार मारतो. दरम्यान, बाहुबलीचा पहिला भाग याच सीनवर संपला होता. त्यामुळे कटप्पाने बाहुबलीला का मारलं? हा जवळपास राष्ट्रीय प्रश्न झाला होता. वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये त्याचाच संदर्भ दिलेला आहे. 

‘आदिपुरुष’ चित्रपटारुन वाद

‘आदिपुरुष’ चित्रपटावरुन वाद पेटलेला असताना ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. 

“हे पत्र 16 जून 2023 रोजी संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या आदिपुरुष  चित्रपटाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी आहे, ज्यात हिंदू धर्म आणि प्रभू श्रीराम, सीतामाता आणि भगवान हनुमान यांना मानणाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. चित्रपट भगवान राम आणि संपूर्ण रामायण यांच्या प्रतिमेचे चित्रण करत आहे. निर्मात्यांना मल्टिप्लेक्समध्ये सवलतीच्या दरात तिकिटे विकून पैसे कमवायचे आहेत, ज्यामुळे आमच्या धर्माबद्दल आणि रामायणावरील विश्वासाबद्दल चुकीचा संदेश जाईल. टी सीरिज आणि निर्माते, लेखक मनोज मुंतशीर आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी संवाद, वेशभूषा यात बदल करत रामायणची खिल्ली उडवली आहे, जी कोणालाही आणि सर्वांनाच न पटणारी आहे,” असं ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी पत्रात लिहिलं आहे.

मंगळवारी गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चित्रपटावर तात्काळ बंदी आणण्याची मागणी केल. तसंच ओम राऊत, मनोत मुंतशीर आणि निर्मांत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *