Headlines

करण जोहर काय मला…. ; ‘भाभीजी घर पर है’ फेम शिल्पा शिंदेचा जळजळीत प्रश्न

[ad_1]

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘भाभीजी घरपर है’ या विनोदी मालिकेतील अंगुरी भाभी ही  भूमिका साकारत शिल्पानं सगळ्यांची मने जिंकली. त्यानंतर शिल्पा ‘बिग बॉस’ (Bigg Boss) या रिअॅलिटी शोमध्ये दिसली. इतकंच नाही तर शिल्पा या सीझनची विजेती देखील ठरली होती. आता शिल्पा ‘झलक दिखला जा’ (Jhalak Dikhhla Jaa)या डान्स शोमध्ये दिसली.  काही काळापूर्वी ही अभिनेत्री शोमधून बाहेर पडली आहे. परंतु या शोमधील काही गोष्टी शिल्पाला आवडल्या नाहीत आणि तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शोच्या परिक्षकांवर निशाणा साधला आहे.

नुकतीच ‘झलक दिखला जा 10’ या शोमधून शिल्पा बाहेर पडली. त्यानंतर शिल्पानं शोच्या परिक्षकांच्या विरोधात एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये शिल्पा नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे. शिल्पानं खासकरुन करण जोहरवर निशाणा साधला आहे. अभिनेत्रीने सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा देत हा व्हिडीओ खासकरुन ‘झलक दिखला जा’ च्या परिक्षकांसाठी बनवला असल्याचं सांगितलं आहे. 

या व्हिडीओमध्ये शिल्पा बोलते, डान्स रिऍलिटी शोच्या परिक्षकांनी स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा आदर केला पाहिजे आणि विचारपूर्वक आपलं मत मांडलं पाहिजे. शिल्पानं परिक्षकांच्या कमेंट्सवर आक्षेप घेतला आहे. शिल्पा पुढे म्हणाली, ‘माझा हा व्हिडिओ झलक दिखला जा पॅनलवर बसलेल्या परिक्षकांसाठी आहे. अभिनेत्रीनं निया शर्माच्या शेवटच्या परफॉर्मन्सवर भाष्य केलं आहे. एकंदरीतच शिल्पानं नियाला दिलेले गुण, तिचा अभिनय, या सर्व प्रतिक्रियांवर वक्तव्य केलं आहे.’

पुढे शिल्पा म्हणाली, ‘नियाला दिलेले गुण, तिचा अभिनय, मला विचारायचं आहे की, करण सर काय मला धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट देणार आहेत का? तीन मिनिटांच्या परफॉर्मन्समध्ये तुम्हाला कुठेही डान्स दिसला नाही का? तुम्हाला डान्समध्येही मनोरंजन हवं आहे. हा डान्सवर आधारित कार्यक्रम आहे. तुम्हाला सेलिब्रिटी स्पर्धक हवे आहेत, तुम्ही त्यांना ऑस्कर देणार आहात की राष्ट्रीय पुरस्कार? असं म्हणत शिल्पानं तिचा राग व्यक्त केला आहे. 

शिल्पा पुढे म्हणते की, तीन मिनिटांच्या पर्फॉर्मन्ससाठी एक कलाकार काय तयारी करतो याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. आपण बोलत नसलो तरीही स्पर्धा आहे. रुबिनाचा (Rubina Dilaik) व्हिडिओ काढा आणि बघा, तिच्यासोबत काहीही होऊ शकलं असतं. याची जबाबदारी कोण घेणार? परिक्षक घेणार? नंतर मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरण्याचा काहीही उपयोग नाही. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याचा आदर करा. (Shilpa shinde lashed out at jhalak dikhhla jaa judges specially karan johar) 

शिल्पाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी शिल्पाचं कौतुक करत तिला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी सत्य बोलण्याचं धाडस दाखवल्याबद्दल तिचे आभार मानलेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *