Headlines

‘जी स्त्री घरात अजय देवगणला…’, Kajol समोरच तिच्या पतीविषयी हे काय बोलून गेला कपिल शर्मा

[ad_1]

Kajol on Being Director in Future : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. काजोलचा हा व्हिडीओ ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मधील आहे. काजोल तिचा ‘सलाम वेंकी’ (Salaam Venky) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. दरम्यान, यावेळी भविष्यात ती कधी दिग्दर्शक होणार नाही असा खुलासा केला. त्यावर कपिल एक विनोद करताना दिसत आहे. 

सोनी टिव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कपिल शर्मा ‘सलाम वेंकी’च्या टीमशी संवाद साधताना दिसत आहे. शोमध्ये काजोलसोबत विशाल जेठवा आणि दिग्दर्शक रेवती दिसत आहेत. यादरम्यान शोमधील इतर कलाकार कपिल आणि टीमसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

हेही वाचा : सलमान खानला AIDS ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

या चित्रपटाबाबत बोलताना कपिलनं काजोलला विचारलं की ‘अजय देवगण सर चित्रपटानंतर दिग्दर्शनाच्या जगात आले आहे, तुझाही दिग्दर्शक बनण्याचा विचार आहे का?’ काजोल म्हणाली, ‘नाही, मला दिग्दर्शक व्हायचे नाही.’ यावर कपिल विनोद करत बोलतो, ‘हो, जी बाई रोज अजय सरांना घरात डायरेक्ट करते, तिला काय गरज आहे.’ यावर काजोल मोठ्यानं हसू लागते. (Ajay Devgn)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.  ‘दृश्यम 2’ नं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात राजीव खंडेलवाल, आहाना कुमरा, राहुल बोस आदी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

रेवती यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शिन केलं आहे. ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट एका तरुण बुद्धिबळपटू कोलावेन्नू वेंकटेशच्या सत्य कथेवर आधारीत आहे, ज्याला ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) आहे. 2004 मध्ये त्यांचे निधन झाले. BLIVE प्रॉडक्शन आणि RTAKE स्टुडिओच्या बॅनरखाली सूरज सिंह, श्रद्धा अग्रवाल आणि वर्षा कुकरेजा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *