Headlines

“ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून…”; ‘बाळासाहेबांचे शिवसैनिक स्वाभिमानी होते’ म्हणत सुप्रिया सुळेंचा शिंदेंना टोला | Supriya Sule comment on CM Shinde and fadnavis being super CM scsg 91

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शेलक्या शब्दांमध्ये टोला लगावला आहे. गुरुवारी सायंकाळी मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोरील माईक खेचल्याच्या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना शाब्दिक चिमटा काढला. यावेळेस सुप्रिया सुळेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला.

घाटकोपरमधील एका कार्यक्रमाला सुप्रिया यांनी गुरुवारी (१४ जुलै रोजी) हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुपर सीएम झाले आहेत का यासंदर्भातील प्रतिक्रिया विचारण्यात आली. याच प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया यांनी माईक खेचल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली.

“आताचे सगळे निर्णय पाहिले तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारुन सगळे निर्णय घेतायत. सुपर सीएम झालेत का ते?” असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया यांना विचारला. “हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारु शकता. ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून घेतला त्यादिवशीच ते लक्षात आलं होतं,” असं उत्तर सुप्रिया यांनी हसत हसत दिलं. पुढे बोलताना, “त्यांना (शिंदे यांना) चालत असेल ते” असं म्हणत सुप्रिया यांनी शिंदेंना फडणवीसांच्या सल्ल्याने काम करणं योग्य वाटत असेल अशा अर्थाचं वक्तव्य केलं.

बंड पुकारल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा अनेकदा उल्लेख करणाऱ्या शिंदे यांच्यावर टीका करताना सुप्रिया यांनीही बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा दाखला दिला. “मला हे कौतुक वाटतं कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसैनिक खूप स्वाभिमानी होते. काय नवीन बदल झालाय मला काही समजेना,” असं सुप्रिया म्हणाल्या.

माईक खेचण्याचा प्रकार नेमका काय?
हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे बहुमत चाचणीच्या दिवशी बंडखोर शिंदे गटामध्ये सहभागी झाले. यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांना बांगर कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात आले असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. हा प्रश्न शिंदे यांना पटकन समजला नाही. ते थोडे गोंधळतच, “कुठल्या पक्षातून आले म्हणजे…” असं म्हणत असतानाच बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक खेचून स्वत: समोर घेत, “ते खऱ्या शिवसेनेत आले,” असं उत्तर दिलं आणि हसत पुन्हा माईक शिंदेंसमोर ठेवला. या साऱ्या प्रकरणावरुन सोशल मीडियाबरोबरच विरोधकांनीही फडणवीसांची ही कृती खटकल्याची टीका केली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *