Headlines

IRCTC ची नवीन स्कीम, रेल्वेचे तिकीट आता काढा, पैसे नंतर भरा

[ad_1]

Paytm Postpaid Buy Now Pay Later:IRCTC कडून एक नवीन सर्विस तुम्हाला खूप पसंत पडू शकते. अनेकदा आपल्याला तिकीट काढायचे असते परंतु, आपल्याकडे पुरेसे पैसे नसते. त्यामुळे अनेकदा समस्या येते. जर तुम्हाला सुद्धा हीच समस्या येत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास ऑप्शनची माहिती देत आहोत.

IRCTC आणि Paytm Postpaid चे नवीन फीचर
पेटीएमवर विना पैसे रेल्वेचे तिकीट बुक करता येऊ शकते. हा एक ऑप्शन आहे. याचे नाव Buy Now, Pay Later आहे. IRCTC च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या अॅपने आता Paytm Postpaid ला इनेबल केले आहे. यामुळे Paytm यूजर्सला तिकीट बुक करताना Buy Now, Pay Later हा ऑप्शन मिळू शकणार आहे.

जर तुम्ही तिकीट बुक करण्यासाठी Paytm Postpaid चा वापर केला तर तुम्हाला ३० दिवसाच्या आत क्रेडिटच्या रुपात ६० हजार रुपयाचा वापर करता येऊ शकतो. याद्वारे तुम्ही तात्काळ रेल्वेची तिकीट बुक करू शकता. नंतर बिल भरू शकता.

वाचाः फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास फक्त या टिप्स वापरा, फोन लगेच मिळेल

याप्रमाणे Paytm Postpaid वरून करा रेल्वेचे तिकीट बुक
१. आपल्या मोबाइल डिव्हाइस वर IRCTC अॅप डाउनलोड करा. नंतर त्याला लॉगइन करा.
२. आपल्या प्रवासाची सविस्तर माहिती भरा. यात स्टेशनची सविस्तर माहिती टाका.
३. नंतर रेल्वे सिलेक्ट करा. तिकीट बुक करण्यासाठी पुढे जा.
४. आता पेमेंट विंडोवर पोहोचाल. तुम्हाला या ठिकाणी Buy Now, Pay Later ची निवड करावी लागेल.
५. Paytm Postpaid वर क्लिक करा. आपल्या पेटीएमद्वारे लॉगइन डिटेल्स टाकून पुढे जा.
६. क्रेंडिशियल टाकल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन एसएमएस मिळेल.
७. बुकिंगला कन्फर्म केल्यानंतर एक ओटीपी येईल.

वाचाः ‘या’ आठवड्यात लाँच झाले हे स्मार्टफोन, पाहा फोनची संपूर्ण लिस्ट, किंमत आणि फीचर्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *